Ahmednagar News : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरु; आमदार गडाखांचा राज्य सरकारला इशारा

Shankarrao Gadakh : कांद्यावरील अनुदान मिळण्यासाठी लावलेल्या अटी रद्द करण्याची मागणी
Shankarrao Gadakh
Shankarrao GadakhSarkarnama
Published on
Updated on

Gadakh Attack on State Government : अहमदनगर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी गारपीट झालेली आहे. त्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरच भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन दिले. यानंतर आज ठाकरे गटाचे आमदार शंकरराव गडाख यांनी अटी-शर्तींवरून अनेक प्रश्न उपस्थित करून राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Shankarrao Gadakh
Satara News : मकरंद पाटलांनी थेट फोन केला अन्‌ मिळाले ३० लाख...

नेवासे बाजार समितीच्या निवडणुकीतील उमेदवार चाचपणी व भेटीगाठी झाल्यानंतर आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांनी पीक विमा वाटप, अवकाळीतील भरपाईबाबत राज्य सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही यावेळी गडाख यांनी दिला आहे.

Shankarrao Gadakh
Pankaja Munde On GST Raid : अचानक जीएसटीची धाड पडल्याने पंकजा मुंडे आश्चर्यचकित..

गडाख म्हणाले, अतिवृष्टीच्या मदतीपासून जिल्ह्यातील पाच मंडलांना वगळण्यात आले आहे. या मंडलातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्या शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी. तसेच पीक विमा वाटपात अनियमितता दिसून येत आहे. त्यात नियमितता आली पाहिजे. जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबाबत सरकार (State Government) फक्त आश्वासन देत आहे. खरीप कांदा अनुदान मिळण्यासाठी अनेक जाचक अटी आहेत. त्या अटी अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत."

या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरून शासनाला जाब विचारण्यात येईल, असा इशाराही आमदार शंकरराव गडाख यांनी दिला आहे.

Shankarrao Gadakh
BJP NEWS : भाजपचा आमदार राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार?

कृषी बाजार समितीच्या (APMC) सोनई व खरवंडी गटातील सोसायटी व ग्रामपंचायत मतदार संघातील मतदारांचा मेळावा सोनई येथे झाला.विरोधकांनी जाणीवपूर्वक निवडणूक लादण्याचा केलेला डाव सुज्ञ मतदार हाणून पाडतील असा विश्वास आमदार गडाख यांनी व्यक्त केला. शेतक-यांच्या सर्व प्रश्नांसाठी आपण कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले. यावेळी निवडणूक करीता अर्ज भरलेले उमेदवार व मतदार उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com