मोठी कारवाई करत महाविकास आघाडीचा शिवाजी कर्डिलेंना दणका

दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने हे संचालक मंडळ बरखास्त करीत, समितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
nagar taluka krushi utpanna bazar samiti
nagar taluka krushi utpanna bazar samitiSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने हे संचालक मंडळ बरखास्त करीत, समितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी आज दुपारी हे आदेश काढले. प्रशासक म्हणून तालुका उपनिबंधक के. आर. रत्नाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी तातडीने बाजार समितीत जाऊन प्रशासकपदाचा पदभारही घेतला आहे. त्यामुळे सत्ताधारी असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांचे समर्थक व विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ( Taking big action, Mahavikas Aghadi hit Shivaji Kardile )

नगर बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक 2016 मध्ये झाली. विजयी संचालक मंडळाची पहिली सभा तीन डिसेंबर 2016 रोजी होऊन सभापती, उपसभापती यांची निवड करण्यात आली होती. संचालक मंडळाची मुदत दोन डिसेंबर 2021 रोजी संपुष्टात आली. महाविकास आघाडीने शिवाजी कर्डिलेच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीवर ही केलेली मोठी कारवाई आहे. त्यामुळे शिवाजी कर्डिले यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

nagar taluka krushi utpanna bazar samiti
सहकार विभागाची नगर तालुका बाजार समितीला ‘कारणे दाखवा’ नोटीस

या संदर्भात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या वेळी शिवसेनेचे शरद झोडगे, प्रवीण कोकाटे, राजेंद्र भगत, संदीप गुंड, डॉ. दिलीप पवार, ऱाष्ट्रवादी कॉंग्रेसचे ॲड. उध्दवराव दुसुंगे, केशव बेरड, कॉंग्रेसचे बाळासाहेब हराळ पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

संदेश कार्ले म्हणाले की, दादा पाटील शेळके नगर तालुका बाजार समितीत संचालकांनी केलेल्या गैरव्यवहार व बाजार समितीत केलेली अवैध बांधकामे, यामुळेच राज्य सरकारने प्रशासक नेमण्याची कारवाई केली.

nagar taluka krushi utpanna bazar samiti
कर्डिले रात्रीतून उपमुख्यमंत्री पवार यांच्या पाया पडून आले..

कार्ले पुढे म्हणाले, की बाजार समितीवर गंभीर आरोप होते. संचालकांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. आम्ही सत्तेचा वापर केला असता, तर जिल्हा उपनिबंधकांनी अहवाल सादर केला असता का? मुदत संपल्याने प्रशासक नेमणे हा सरकारचा अधिकार आहे. खरतर ही प्रशासकाची कारवाई खूप पूर्वीच व्हायला हवी होती.

बाजार समितीला दादा पाटलांचे नाव देऊन हे आपली कातडी वाचवत आहेत. मागील दहा-पंधरा दिवसांत झालेल्या व्यवहाराची चौकशी करून तातडीने दिलेल्या धनादेशाची चौकशी करायला हवी. बाजार समितीवर प्रशासक नेमण्यास उशीर झाला आहे. बाजार समितीची मुदत संपल्याने आता संचालकांनी जास्त आव आणू नये, असे सांगतानाच आता अंधारात उपमुख्यमंत्री यांचे पायधरायला जाऊ नका, असो खोचक टोला शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता कार्ले यांनी लावला.

बाजार समितीचे संचालक नेमके कोणत्या पक्षात आहेत, ते त्यांनी आधी स्पष्ट सांगावे, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दुसुंगे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com