Ganesh Festival News : विनापरवाना गणेश विसर्जन मिरवणूक काढणे भोवले; माजी महापौरांसह ४० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल !

Kolhapur Ganesh Festival News : साउंड सिस्टिम मालकासह, जनरेटर ऑपरेटर, ट्रॅक्टरचालक, डीजे ऑपरेटर यांच्यावर गुन्हा...
Kolhapur Ganesh Festival News :
Kolhapur Ganesh Festival News : Sarkarnama
Published on
Updated on

राहुल गडकर -

Kolhapur News : विनापरवाना गणेश विसर्जन मिरवणूक काढल्याप्रकरणी माजी महापौर दिगंबर फराकटे यांच्यासह चाळीसपेक्षा अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. साउंड सिस्टिम मालकासह, जनरेटर ऑपरेटर, ट्रॅक्टरचालक, डीजे ऑपरेटर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Kolhapur Ganesh Festival News :
Nashik NCP News : मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने आले अन् जखमेवर मीठ चोळून गेले!

कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी जुना बुधवार तालीम मंडळाच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. पोलिसांनी परवानगी दिली नसताना विनापरवाना गणेश विसर्जन मिरवणूक काढल्याने पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह माजी महापौर दिगंबर फराकटे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

शहरात वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, विनापरवाना मिरवणूक काढणे, पोलिसांशी हुज्जत घालणे, आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणे आदी कारणांमुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यामुळे आता गणेश मंडळ कार्यकर्ते अडचणीत आले आहेत.

Kolhapur Ganesh Festival News :
BJP Political News : भाजपकडून २०२४ ला खासदारकीचा पत्ता कट ? रामदास तडस म्हणाले, " मी भाजपचा सच्चा कार्यकर्ता असून...''

कोल्हापूर पोलिसांनी दिला होता इशारा -

कोल्हापूर पोलिसांनी जुना बुधवार तालमीच्या पदाधिकाऱ्यांना अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जन करावे, अशी सूचना दिली होती. कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या दिवशी विसर्जन करू नये, असे सांगत दुसऱ्या दिवशी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, या दबावाला झुगारून जुना बुधवार तालीम मंडळाकडून दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढण्यात आली होती.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com