Nagar Political News: "मंत्रालय उडवून देऊ," अशी धमकी देणारा फोन गुरुवारी आल्याने मंत्रालय परिसरात खळबळ उडाली होती. फोन करणाऱ्या व्यक्तीला मंत्रालय सुरक्षा यंत्रणांनी शोधून काढले आहे. तो अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याला शोधण्यास नगर पोलिसांना यश आले आहे. तो शेवंगाव तालुक्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे. बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे(वय34) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Latest Political Marathi News)
मुख्यमंत्र्यांशी आताच बोलणे करून द्या, नाही तर मंत्रालय उडवून देऊ, अशी धमकी त्याने गुरुवारी दिली होती. या व्यक्तीच्या प्राथमिक चौकशीत तो स्पर्धा परीक्षा देत असून परीक्षा पारदर्शक व्हावी या साठी त्याला मुख्यमंत्र्यांशी थेट बोलायचे होते. मात्र प्रयत्न करून हा संपर्क करू न दिल्याने त्याने नगरच्या पोलीस हेल्प लाईन नंबरवर मंत्रालयात बॉम्ब असल्याचे सांगितले. याबाबत पोलीस या तरुणाकडून सखोल चौकशी करत असल्याचे समजते.
नगरच्या हेल्प लाईन नंबरवर फोन करून मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी त्याने दिली होती. यानंतर याबाबत मुंबई पोलिसांनी कळवल्यानंतर तातडीने मंत्रालयात बॉम्ब शोध पथकाने तपासणी केली. मात्र यात काही आढळून आले नाही. मात्र या प्रकाराने थेट मंत्रालयात घबराट आणि खळबळ उडाली होती.
यानंतर नगर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केल्यानंतर शेवगाव तालुक्यातील बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे याने हा निनावी धमकीचा फोन केल्याचे पुढे आले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.