Ashish Shelar News : महाराष्ट्रद्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना जनाची नाही, तर किमान..; शेलारांनी ठाकरेंची खिल्ली उडवली..

Maharashtra Politics : पंगती बसू दे आणि जेवणावळीही उठू दे…
Maharashtra Politics
Maharashtra Politics Sarkarnama

Mumbai : "महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मोदक आणि पंचपक्वान्नाचे पंचतारांकित जेवण घालून उद्धव ठाकरे हे त्यांची तोंडे गोड करीत आहेत. पंगती बसू दे आणि जेवणावळीही उठू दे… फक्त काल-परवापर्यंत स्वाभिमानाने जगणाऱ्यांना महाराष्ट्रद्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना जनाची नाही, किमान मनाची तरी वाटू दे,अशा शब्दांत भाजपचे आमदार आशिष शेलारांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फटकारले आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीवर शेलारांनी टि्वट करीत निशाणा साधला आहे. "मुंबईत डरपोकांचा मेळावा ‘घमंडिया’ नावाने होत आहे. ज्यांनी ज्यांनी काल-परवापर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा द्वेष केला, ज्या काँग्रेसने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांवर गोळ्या झाडल्या, अशा सगळ्यांचे महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वाजत-गाजत जोरदार स्वागत करीत आहे," असे शेलारांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

Maharashtra Politics
Supriya Sule News : मुंबईचा कारभार PMO कडून चालवला जाणार का ? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

"मुंबईत होणारी इंडियाची बैठक नाही तर ‘घमेंडिया’ची बैठक आहे. माजी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे ज्याला ‘गरूड झेप’ म्हणत आहेत ती गरुड झेप नाही तर,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी तयार झालेली श्वापदांची टोळी आहे," असे सडेतोड उत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले आहे.

Maharashtra Politics
INDIA Mumbai Meet : गद्दारांना किंमत देऊ नका ; विरोधकांवर आदित्य ठाकरे गरजले

"राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तुमच्या याच टोळीने शंभर कोटी वसुली केली, कोरोना काळात कोट्यवधींची कंत्राटे घशात घातली. मृतदेहांसाठीच्या बॅगही त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. तुम्ही लालू प्रसाद यादवांच्या माध्यमातून मोदी यांच्या ‘नरड्यावर बसण्याचे स्वप्न’ बघा. पण जनता तुमच्या छाताडावर बसेल. तुम्ही मोदी यांना जेवढ्या शिव्या द्याल जनता पंतप्रधान मोदी यांच्यावर तेवढे जास्त प्रेम करेल," असे बावनकुळे म्हणाले,

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com