Protest Against Bhide Guruji: पिंपरीत काँग्रेसनंतर राष्ट्रवादीचेही भिडे गुरुजींविरोधात आंदोलन; तत्काळ अटक करण्याची मागणी

Sambhaji Bhide Guruji News: भिडे गुरूजींचा बोलविता धनी कोण ते शोधा; राष्ट्रवादीची मागणी
Sambhaji Bhide Guruji
Sambhaji Bhide Guruji Sarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : 'शिवप्रतिष्ठान'चे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत अमरावती जिल्ह्यात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्याविरुद्ध राज्यभर विरोधी पक्षांकडून निषेध आंदोलने सध्या सुरु आहेत. त्यांच्या अटकेची मागणी या आंदोलनातून करण्यात येत आहे.

पिंपरीतही काँग्रेसने भिडे गुरुजी यांच्या प्रतिमेला शनिवारी 'जोडे मारो' आंदोलन करत निषेध व्यक्त केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही (शरद पवार गट) मंगळवारी पिंपरीतच आंदोलन करत त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली.

काँग्रेसचे आंदोलन झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातच राष्ट्रवादीने शहराध्यक्ष अजित गव्हाणेंच्या नेतृत्वात आंदोलन केले. यावेळी त्यांनी भिडे यांच्या सारखे लोक हे थोर महात्म्यांबद्दल अवमानकारक टिप्पणी करून समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केला. एकाच आठवड्यात महात्मा गांधी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अवमान करणाऱ्या भिडेंचा बोलाविता धनी कोण आहे, ते शोधून काढण्याची मागणी त्यांनी केली.

Sambhaji Bhide Guruji
Narendra Modi In Pune : शिरुर लोकसभेचा प्रश्न मिटला ? दहा वर्षानंतर पुन्हा मोदींच्या हातात आढळरावांचा हात

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक समाजसुधारकांबाबत भिडेंनी अपमानास्पद विधाने केली आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. महिलाध्यक्षा कविता आल्हाट यांनी देखील आपले मत व्यक्त केले.

माजी नगरसेवक राहुल भोसले, शाम लांडे, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, कार्याध्यक्ष फजल शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप यांच्यासह कविता खराडे, विजय लोखंडे, गोरक्ष लोखंडे, संजय औसरमल, गंगा धेंडे, मनीषा गटकळ आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी भिडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Sambhaji Bhide Guruji
Ahmednagar News: नगरमध्ये क्राईम रेट वाढला; पालकमंत्री, लोकप्रतिनिधींकडून गुप्तचर विभागासह गुन्हे शाखेवर ताशेरे

भिडे गुरुजींना राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्ये करण्याची खोडच असून ती ते जाणीवपूर्वक करीत असल्याचा हल्लाबोल गव्हाणेंनी केला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात भिडेंसारख्या अपप्रवृत्तींना थारा देता कामा नये. कारण त्या प्रवृत्ती समाज भरकटविण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही गव्हाणे म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com