Kolhapur Loksabha News : ठाकरे गट कोल्हापूर, हातकणंगलेत उमेदवार देणार; शिंदे गटाची होणार अडचण

Udhav Thackeray उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली.
Udhav Thackery, Eknath Shinde
Udhav Thackery, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Loksabh News : कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दोन्ही ठिकाणी ठाकरे गट शिवसेनेचाच उमेदवार असावा अशी आग्रही मागणी सर्वच नेते पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर बैठकीत व्यक्त केली. दोन्ही मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार शिंदे गटासोबत गेले तरी कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना आणि ठाकरे यांना मानणारा गट मोठा आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात ठाकरे गट घेईल ती भूमिका निर्णायक ठरणार आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे Udhav Thackeray यांनी जिल्हानिहाय बैठकांचा सपाटा लावला आहे. आज कोल्हापूर Kolhapur जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघातील आढावा बैठक झाली. यावेळी कोल्हापूरचे ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते. दोन्ही लोकसभा मतदारसंघातील स्थितीचा विधानसभानिहाय आढावा उद्धव ठाकरे यांनी स्थानिक नेत्यांकडून घेतला.

दोन्ही लोकसभा मतदारसंघात काही होऊ द्या पण भाजपचा उमेदवार विजयी होता कामा नये, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना दिल्या. आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत, इंडिया आघाडीत निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मात्र कुठल्याही परिस्थितीसाठी आपल्या पक्षाने तयारी करावी.

वेळ आली तर स्वबळाची तयारी सुद्धा पक्षाची असली पाहिजे अशी आपली तयारी आतापासूनच सुरू करा अशा प्रकारचे मार्गदर्शन ठाकरे यांनी नेत्यांना केलं. हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने आणि कोल्हापूरचे खासदार संजय मंडलीक दोघेही ठाकरे यांना सोडून गेल्यानंतर या मतदारसंघात ठाकरे गट बॅकफूटवर आला आहे.

Udhav Thackery, Eknath Shinde
Sushma Andhare यांची शिंदे - फडणवीसांवर बोचरी टीका | BJP | Shivsena | NCP | Sarkarnama Video

मात्र, हातकणंगलेमधून मुरलीधर जाधव आणि कोल्हापूरमध्ये विजय देवणे, संजय पवार यांनी संघर्ष करून गटाचे अस्तित्व दाखवले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना आणि ठाकरे यांना मानणारा गट मोठा आहे, त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात ठाकरे गट घेईल ती भूमिका निर्णायक ठरेल.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com