गृहखातं कसं असतं?, असं जयंत पाटलांनी विचारलं अन् आबांनी अशी टाकली गुगली...

ही आठवण खुद्द जयंत पाटील यांनीच सांगितली आहे.
Jayant Patil and R. R. Patil
Jayant Patil and R. R. Patil

सांगली : जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे काही काळासाठी गृहखात्याचा कारभार होता. पण त्याआधी या खात्याचा अनुभव असलेले आर. आर. पाटील (R. R. Patil) म्हणजे आबांना जयंत पाटलांनी या खात्याबाबत विचारले होते. खात्याचा कार्यभार स्वीकारण्याआधी एका लग्नामध्ये दोघांची भेट झाली. जयंतरावांनी आबांना गृहखाते कसं असतं, असा थेट सवाल केला. त्यावर आबांनीही त्यांना तुम्हाला ब्लड प्रेशर किंवा शुगर आहे का?, असं मिश्कीलपणे विचारलं. जयंतरावांनी नाही असं सांगताच आबा म्हणाले, गृहखाते घ्या, तुम्हाला दोन्ही गोष्टी सुरू होतील...

ही आठवण खुद्द जयंत पाटील यांनीच सांगितली आहे. सांगलीतील (Sangli) पोलीस मुख्यालयातील नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आमदार सुमन पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विक्रम सावंत, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी आदी उपस्थित होते.

Jayant Patil and R. R. Patil
काँग्रेसने बहिष्कार टाकलेल्या निवडणुकीत एका महिला आमदाराचा चकवा!

गृहमंत्री झाल्यावर ब्लडप्रेशर आणि शुगरचा त्रास सुरू होतो, हे आपणाला आरआर आबांनी सांगितल्याचे जयंत पाटील म्हणाले. पोलिसांचे काम किती तणापूर्ण असतं हे सांगताना पाटील यांनी ही आठवण सांगितली. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी गृहमंत्री झाल्यावर रक्तदाब वाढल्याचे सांगितले होते. 2009 मध्ये आर आर आबा पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर आपल्यावर गृहखात्याची जबाबदारी दिली होती. पण हे खातं घेण्याआधी एका लग्नात आबांना विचारले, गृहखाते कसे असते? त्यावर आबांनी मला विचारले की, तुम्हाला ब्लड प्रेशर किंवा शुगर आहे का? मी नाही म्हणून असं सांगताच आबा म्हणाले, गृहखाते घ्या, तुम्हाला दोन्ही गोष्टी सुरू होतील, अशी आठवण जयंत पाटील यांनी सांगितली.

आबांचे हे बोल खरे ठरल्याचेही पाटील म्हणाले. गृहमंत्री झाल्यानंतर आपल्याला रक्त दाबाचा त्रास सुरू झाला. खासगी सचिवालाही रक्तदाब सुरू झाला, याची कबुली जयंती पाटील यांनी दिली. तेव्हा ठरवलं की, आता रक्तदाबाचा त्रास सुरू झाला, साखर मागे लावून घ्यायची नाही, असंही त्यांनी सांगतलं. पण मत्र्यांवर एवढा ताण असेल तर पोलीस किती तणावाखाली जगत असतील. याचा विचार केला पाहिजे. पोलिसांना अधिकार वाढवून देणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

Jayant Patil and R. R. Patil
अखेर शरद पवारांनाच मुख्यमंत्र्यांकडे शिष्टाई करावी लागली...

कुठे काही गोंधळ झाला आणि पोलिसांनी हवेत गोळीबार केला तर चौकशी होते. गोंधळ घालणारे बाजूलाच राहतात. आपण पोलिसांना संरक्षण देऊ तेवढे अधिक धाडसाने पोलीस रस्त्यावर उतरतील. अनेक वेळा राज्यकर्त्यांमध्ये समज-गैरसमज होतात. त्यावेळी राज्यकर्ते तातडीने पहिल्यांदा पोलिसाला बदला, अशी भूमिका घेतात. पण हा उपाय होऊ शकत नाही. खरंच जर त्याची चूक असेल सुधारण्याची संधीही दिली पाहिजे. त्याचप्रमाणे पोलिसांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याबरोबर त्यांच्यावरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे, असे मतही पाटील यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com