अखेर शरद पवारांनाच मुख्यमंत्र्यांकडे शिष्टाई करावी लागली...

या निमित्ताने अनेक दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट झाली.
Cm Uddhav Thackeray- Sharad Pawar
Cm Uddhav Thackeray- Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : कोरोना महामारीचा (Corona endemic) तळागाळातील सामान्य नागरिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनामुळे शेतकरीच नव्हे तर, रस्त्यावरच्या भाजी विक्रेत्यापासून ते एसटी कर्मचाऱ्यांपर्यंत अनेकांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या आपण पाहिल्या. या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी अनेक दिवसांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट झाली. या भेटीत स्त्यावरच्या भाजी विक्रेत्यापासून ते एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि बंद पडलेल्या चित्रपटगृहापर्यंत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस महासंचालक संजय पांडे आदी उपस्थित होते.  या बैठकीत वाहतूक महासंघाचे शिष्टमंडळही उपस्थित होते. या शिष्टमंडळानेही आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. तर मुख्यमंत्र्यांनीही या शिष्टमंडळाला त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

Cm Uddhav Thackeray- Sharad Pawar
कॅप्टन पुन्हा काँग्रेसला देणार धक्का! अमित शहांच्या भेटीला दिल्लीत

- वाहतूक महासंघाच्या मागण्या

कोरोनामुळे वाहतूकदारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे वार्षिक मोटार वाहन करात सूट मिळणे, व्यवसाय करात सूट मिळणे, शाळा व धार्मिक स्थळांच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा मोटार कर पूर्ण माफ करणे, राज्यभरात वाहने व बसेस थांबण्यासाठी पार्किंग जागा उपलब्ध करणे ,  कामगार वाहतूक करणाऱ्या वातानुकूलित बसेसचे कर कमी करणे, जड व अवजड वाहनांना राज्यातील प्रमुख शहरांत 10 ते 16 तास करण्यात आलेली प्रवेश बंदी उठविणे, कालबाह्य प्रलंबित वाहतूक केसेस रद्द कराव्यात, सार्वजनिक सेवा वाहनाच्या तपासणीचे पोलिसांचे अधिकार कमी करणे, अशा मागण्या वाहतूक महासंघाचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन, उपाध्यक्ष महेंद्र लूले, सरचिटणीस दयानंद नाटेकर यांनी केल्या.

- वाहतूकदारांच्या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढणार

''कोरोना महामारीमूळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा लगेच काढला जाईल. त्यासाठी राज्यातीस वित्त व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील शहरांमध्ये बसेस व ट्रक्स यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात वाहनतळ असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने नगरविकास विभागाला सूचना देण्यात येतील व मोकळ्या जागांचे नियोजन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. त्याचबरोबर चेक पोस्ट्सच्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यासंदर्भातही नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

- तर चित्रपटगृहांनी अग्नी, स्थापत्यविषयक सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करावीत, तसेच एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांवर योग्य तोडगा काढणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com