नगरमधील दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे निर्देश

अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्हा रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेसरकारनामा

अहमदनगर : अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांचे प्रमाण वेगात घटत आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात नवीन तयार केलेल्या कोविड विभागातील अतिदक्षता विभागात 17 कोविड रुग्ण उपचार घेत होते. त्यातील दहा जणांचा आज मृत्यू झाला. ही आग शॉकसर्केटमुळे लागली होती, अशी अधिकृत माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये सहा पुरूष व चार महिलांचा समावेश आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत चौकशीची मागणी केली आहे. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली. The Chief Minister directed a thorough inquiry into the accident in Ahmednagar

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच जिल्हा शल्यचिकित्सकांच्याही वाहनाला अचानक आग लागली होती. या बाबत चौकशी सुरू असतानाच आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागली.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, अहमनगर येथे जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे.

उद्धव ठाकरे
आजही मला मुख्यमंत्री असल्याचे वाटते : देवेंद्र फडणवीस

या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

या ट्विट नंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्धीपत्रक काढत चौकशी समिती नेमल्याची घोषणा केली. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com