अहमदनगर - राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने महावितरण प्रशासनाकडून भारनियमन सुरू करण्यात आले आहे. या भारनियमनाची पूर्वसूचना न दिल्याचे कारण देत अहमदनगर महापालिकेतील भाजप ( BJP ) नगरसेवक मनोज कोतकर यांनी केडगाव उपनगरातील महावितरण कार्यालयात काल ( शुक्रवारी ) तोडफोड केली होती. ( The corporator who vandalized the MSEDCL office was arrested by the police and released )
मनोज कोतकर यांनी महावितरण कार्यालयात केलेल्या तोडफोड प्रकरणी महावितरण अधिकाऱ्यांनी आज कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच नगरसेवक मनोज कोतकर अहमदनगर शहरातून पसार झाल्याची चर्चा सुरू झाली.
कोतवाली पोलिसांनी तपास करत मनोज कोतकर यांना शिरूर ( जि. पुणे ) येथून ताब्यात घेतले. केडगाव येथे महावितरण कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मनोज कोतकरची सुटका झाली आहे. आरोपी मनोज कोतकरचा जबाब नोंदवून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. उद्या ( रविवारी ) पुन्हा तपासासाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक तथा गुन्ह्याचे तपासी अधिकारी मनोज कचरे यांनी दिली.
काल ( शुक्रवारी ) अहमदनगर शहरातील केडगाव उपनगरात महावितरणकडून भारनियमन करण्यात आले. उपनगरातील नागरिकांनी व मनोज कोतकर यांनी अचानक वीज गेल्याने महावितरण कार्यालयात संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र दुरध्वनी बंद होते. म्हणून संतप्त झालेले मनोज कोतकर केडगाव मधील महावितरण कार्यालयात काल ( शुक्रवारी ) सायंकाळी गेले. तेथे महावितरण अधिकारी नसल्याने संतप्त मनोज कोतकरांनी महावितरण कार्यालयात तोडफोड केली होती. तसेच या पुढे महावितरण कर्मचाऱ्यांनी सामान्य नागरिकांचे दुरध्वनी न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.