Patan Dam Victims Agitation: मराठवाडी धरणग्रस्त संतप्त; म्हणाले, पालकमंत्र्यांचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय'...

Koyana Dam: कोयना धरणाच्या जलाशयात उतरून धरणग्रस्तांनी शपथ घेतली.
Dam Victims Agitation
Dam Victims Agitationsarkarnama
Published on
Updated on

- राजेश पाटील

Dhebewadi News : कोयनेसह विविध प्रकल्पग्रस्तांच्या समस्या कायम स्वरूपी सोडवून त्यांचे विकसनशील पुनर्वसन व्हावे, यासाठी महिनाभरात मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलाविण्याचे लेखी पत्र देऊन तीन महिने उलटले, तरीही बैठक न झाल्याने मराठवाडी धरणग्रस्तांनी धरणस्थळी पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्री व शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘... ह्यांचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय’ अशा घोषणा दिल्या.

श्रमिक मुक्ती दलाने Shramik Mukti Dal केलेल्या आवाहनानुसार आज सकाळी अकराच्या सुमारास मराठवाडी धरणस्थळी धरणग्रस्त Dam affected जमा झाले. इथून सांगली जिल्ह्यात पुनर्वसित झालेले प्रकल्पग्रस्तही मोठ्या संख्येने आले होते. सुरुवातीला जलाशयाच्या काठावर धरणग्रस्तांनी ठिय्या ठोकला.

त्या ठिकाणी मार्गदर्शन करताना श्रमिक मुक्ती दलाचे दिलीप पाटील म्हणाले, ‘पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमची निराशा केली आहे. पालकमंत्र्यांनी महिन्यात बैठक घेण्याचे आश्‍वासन देणारे पत्र देऊन तीन महिने झाले, तरीही बैठक झाली नाही. कुटुंब प्रमुख असूनही त्यांनी याप्रश्‍नी लक्ष दिले नाही.

Dam Victims Agitation
Patan News : डोंगरी विकासासाठी 200 कोटी रुपये देणार... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्यागाची भूमिका घेणाऱ्या माणसांना फसवू नका.’ सुरेश पाटील यांचेही भाषण झाले. शंकर देसाई, गोविंद जाधव, आनंदा भिंगारदेवे, सुभाष शिंदे, बापूराव नांगरे, नाना मोहिते, संजय जाधव, जयवंत रेठरेकर, भगवान जगताप आदींसह धरणग्रस्त उपस्थित होते. धरणाच्या जलाशयात उतरून धरणग्रस्तांनी शपथ घेतली.

Dam Victims Agitation
Satara News : ...तर देशातील राजकिय समीकरणे बदलतील : उदयनराजेंनी व्यक्त केली भिती

धरणग्रस्तांची शपथ...

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांना विकसनशील पुनर्वसन देण्याऐवजी त्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारी धोरणे शासनाने घ्यायला सुरुवात केली आहे. ज्या नदीने आमच्या पिढ्यानपिढ्या पोसल्या तिला अडवून आमची गावे बुडविली गेली. त्याच या नदीची शपथ घेऊन आज आम्ही निर्धार करत आहोत, की कितीही लढावे लागले तरी विकसनशील पुनर्वसन करण्यास सरकारला भाग पाडणारा संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com