
Sangli News : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीत पेच निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र खासदार विशाल पाटील यांनी ही निवडणूक अखेर बिनविरोध केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशाही 21 अर्जच शिल्लक राहिले. यामुळे कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक उपसंचालक (साखर) गोपाळ मावळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. यामुळे कारखान्याच्या संचालकपदी 21 जणांची निवड झाली असून यात 19 नवे चेहरे आहेत. तर खासदार विशाल पाटील यांच्यासह माजी केंद्रिय मंत्री प्रतिक पाटील यांचे चिरंजीव हषवर्धन पाटील, अमित पाटील हे देखील संचालक झाले आहेत. यामुळे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची चौथी पिढीही आता राजकारणात आल्याचे सांगली जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.
वसंतदादा कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सन 2025 ते 2030 बिनविरोध करण्यासाठी खासदार विशाल पाटील यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले होते. त्यांना अखेरच्या क्षणी यात यश आले असून हर्षवर्धन पाटील संचालक झाले आहेत. त्यांनी कारखान्याच्या निवडणुकीतून सक्रीय राजकारणात आता पाऊल टाकले आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे 36 हजार सभासद असून 21 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. यामध्ये सांगली, मिरज, आष्टा, भिलवडी, तासगाव या पाच गटातून प्रत्येकी तीन प्रमाणे पंधरा तर बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था सभासद मतदासंघातून दोन, अनुसूचित जाती किंवा जमातीचा एक, भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्ग गटातून एक तर महिला गटातून दोन उमेदवारांना संधी मिळणार होती.
त्याप्रमाणे कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक उपसंचालक (साखर) गोपाळ मावळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणुकीचा कार्यक्रम पाहिला. निवडणुकीसाठी 144 अर्ज दाखल झाले होते. यातून अर्ज छाननीत 5 अर्ज बाद झाले होते. तर सोमवार (ता. 24) पर्यंत 13 जणांनी माघार घेतली. शेवटच्या दिवशी 126 अर्ज शिल्लक होते. यापैकी 105 जणांनी माघार घेतल्याने वसंतदादा कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली.
वसंतदादा साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. सभासदांचा विश्वास, सहकार्यामुळे हा विजय मिळाला आल्याचे खासदार विशाल पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी, कारखान्याचे सर्व संचालक सक्षमपणे कार्यरत राहिले आहेत. पुन्हा एकदा सर्वजण एकजुटीने कारखान्याच्या प्रगतीसाठी कार्यरत राहू. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि समृध्दिसाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले आहे.
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यावर्षी विद्यमान अध्यक्ष खासदार विशाल पाटील यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली. त्यामुळे 21 पैकी 19 संचालक हे नवे चेहरे असून सर्वात तरूण चेहरा हर्षवर्धन पाटील यांचा आहे. या संचालक मंडळात फक्त विशाल पाटील आणि मावस बंधू अमित पाटील जुने संचालक आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.