Kolhapur Political News : कोल्हापूर लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना समाजाच्या विविध घटकातून मोठा पाठींबा मिळत आहे. विकसित भारतासाठी पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदी निवडण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. विशेषतः कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचा तुल्यबळ सामना पाहायला मिळत असताना मताधिक्य कोणाला मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक Sanjay Mandlik यांनी मंगळवारी (ता. २३) प्रचारार्थ कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून प्रचारफेरी काढली. सकाळी ९ वाजता वळीवडे गावातून सुरू झालेल्या या प्रचारफेरीला मतदारांचा उदंड प्रतिसाद लाभला. वसगडे, सांगवडे, सांगवडेवाडी हलसवडे या गावांना भेटी देत संजय मंडलिक आणि माजी आमदार अमल महाडिक सहभागी झाले होते.
दरम्यान, नेर्ली गावचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश उर्फ अंकुश कृष्णात पुजारी यांनी सतेज पाटील गटाला सोडचिट्ठी देत कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. सतेज पाटील यांच्या सुडाच्या राजकारणाला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे पुजारी यांनी सांगितले. गावामध्ये केंद्र सरकारचा आलेला निधी स्वतःच्या नावावर खपवण्याचा प्रकार सतेज पाटील Satej Patil यांनी केला हे पटले नाही, असे मत पुजारी यांनी व्यक्त केले. माजी आमदार अमल महाडिक यांच्या विचारांनी प्रभावित होवून भाजपमध्ये प्रवेश केल्याचं पुजारी म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा निवडणुकीत Lok Sabha Election मंडलिक यांना गावातून मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. संजय मंडलिक यांनी बोलताना सतेज पाटील यांचा खरा चेहरा आता उघड होत असून लोक त्यांना सोडून चालले आहेत अशी टीका केली. गावामध्ये विकासगंगा आणण्यासाठी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केली.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.