Maan Political News : दहिवडीत इमारत उद॒घाटनावरुन राजकारण पेटले; आमदार समर्थक काळे झेंडे दाखवणार...

Sadhana Gundage देशमुखांनी शरद पवारांच्या हस्ते इमारतीच्या उद्घाटनाचा घातलेला घाट चुकीचा असून आम्ही काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्षा साधना गुंडगे यांनी दिला आहे.
Sharad Pawar, Jaykumar Gore
Sharad Pawar, Jaykumar GoreSarkarnama

-विशाल गुंजवटे

Maan Political News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे शुक्रवारी माणच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते दहिवडी नगरपंचायतीच्या नुतन इमारतीचे उद्‌घाटन होणार आहे. यातून सध्या माण तालुक्यात राजकारण पेटले आहे. या इमारतीसाठी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी निधी मंजूर करुन आणला होता. पण, ज्यांनी कधी एक रूपयांचे विकास काम दहिवडी शहरात आणले नाही. त्या प्रभाकर देशमुखांनी या इमारतीचे उद्‌घाटन शरद पवारांच्या हस्ते करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे आमदार समर्थक काळे झेंडे दाखवणार आहेत.

याबाबत आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore यांच्या समर्थक माजी नगराध्यक्षा साधना गुंडगे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे इशारा देताना म्हटले की, दहिवडी Dahiwadi नगरपंचायतीच्या नूतन इमारतीसाठी आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नामुळे मी नगराध्यक्ष असताना निधी मंजूर झाला होता. आमच्या सर्व सहकाऱ्यांचे त्या कामात योगदान आहे.

ज्यांनी जिल्हा नियोजनचा नियमित निधी सोडून कधी एक रुपयाचे विकासकाम दहिवडी शहर किंवा तालुक्यात आणले नाही, त्या देशमुखांनी शरद पवारांच्या हस्ते इमारतीच्या उद्घाटनाचा घातलेला घाट चुकीचा असून आम्ही महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्षा साधना गुंडगे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

सौ. गुंडगे यांनी पत्रकात नमूद केले कि, फेब्रुवारी २०१७ मध्ये ठराव होवून दहिवडी नगरपंचायतीची नूतन इमारत उभारण्याचे निश्चित झाले होते. मी नगराध्यक्ष असताना एक कोटीहून अधिक निधीला माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत मंजूरी देण्यात आली होती. त्या ठरावाला वैशाली कदम सूचक आणि नलिनी काशिद अनुमोदक होत्या. ता. ७ जून २०१९ रोजी आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते नगरपंचायत इमारतीच्या बांधकामाचा प्रारंभ करण्यात आला होता.

Sharad Pawar, Jaykumar Gore
Satara Political News : लोकसभेसाठी लक्ष्मण माने महाविकास आघाडीकडे या जागा मागणार...

माण तालुक्यासाठी असणाऱ्या पाणी योजनांची कामे रखडविण्याचा देशमुख यांनी प्रयत्न केला. जिहे- कठापूरच्या वाढीव योजनेच्या कामांचे टेंडर रखडविण्याचे पाप त्यांनी केले. आमदार गोरेंनी प्रयत्न केल्याने नगरपंचायत इमारतीला निधी मिळाला. आम्ही केलेल्या कामाचे विरोधकांनी श्रेय घेऊ नये.

तुम्ही निधी मंजूर करुन आणा आणि खुशाल त्या कामांची उद्घाटने करा. त्याबद्दल आमचे काही म्हणणे नाही, मात्र आमच्या कामाचे श्रेय घेणार असाल तर शरद पवारांच्या कार्यक्रमाचा आम्ही सर्व आजी, माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते काळे झेंडे दाखवून निषेध करु, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Edited By : Umesh Bambare

Sharad Pawar, Jaykumar Gore
Maan Shivsena News : ठाकरे गट शिवसेनेचा नेता करतोय माण, खटावमध्ये टँकरने मोफत पाणीपुरवठा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com