Maan Shivsena News : ठाकरे गट शिवसेनेचा नेता करतोय माण, खटावमध्ये टँकरने मोफत पाणीपुरवठा...

Shekhar Gore शेखर गोरे यांनी निस्वार्थी भावनेने स्वखर्चातून २०१२ पासून या मतदारसंघात शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानतर्फे टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.
Shekhar Gore
Shekhar Goresarkarnama
Published on
Updated on

-विशाल गुंजवटे

Maan Political News : माण- खटाव तालुक्यात पाऊसाने ओढ दिल्याने नागरीकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शासनामार्फत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे मात्र, तोही अपुरा पडत असल्याने माण- खटाव मतदारसंघात स्वखर्चातून विविध विकासकामे करणारे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) जिल्हा संपर्कप्रमुख व सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानतर्फे येथील २५ गावे व वाड्यावस्त्यांवरील पाणीटंचाईने हैराण झालेल्या नागरीकांना टँकरने मोफत पाणीपुरवठा केला जात आहे.

माण मतदारसंघातील Maan नागरीकांना टंचाई काळात पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. यासाठी शेखर गोरे Shekhar Gore यांनी निस्वार्थी भावनेने स्वखर्चातून २०१२ पासून या मतदारसंघात शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानतर्फे टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. यावर्षीही टंचाईची दाहकता वाढल्यानंतर स्वखर्चातून मागेल त्या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे काम ते करत आहेत.

माण-खटाव तालुक्यातील महिमानगड, वडगाव, वावरहिरे, कोळेवाडी, परतवडी, मुळीकवस्ती, कळसकरवाडी, नवलेवाडी, वारुगड, तोंडले, भालवडी, बुरुंगले वस्ती मोही, उकिर्डे, पांढरवाडी, डंगिरेवाडी, स्वरूपखानवाडी, खुटबाव, कुळकजाई, मार्डी, वाकी, भवानवाडी (दहिवडी), मांडवे (खटाव), गोसावीवाडी (खटाव), तडवळे(खटाव) या २५ गावे व वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करत आहेत.

माण मतदारसंघात तीव्र पाणीटंचाई भासत असताना प्रशासन त्यांच्या परीने पाणीपुरवठा करण्याचे काम करत आहे. मात्र नागरीकांना पुरेसे होत नाही. पाणी मागणी केल्यानंतर प्रस्ताव मंजूरीत नागरीकांची दमछाक होते. शेखरभाऊ गोरेंच्या प्रतिष्ठानकडे कोणताही प्रस्ताव करावा लागत नाही. मागणी केल्यास तात्काळ स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

Shekhar Gore
Maan Political News : छावणींच्या अनुदानावरुन गोरे, देशमुखांमध्ये श्रेयवाद; नेमका पाठपुरावा कोणाचा..?

यासाठी त्यांनी पिंगळी येथील येथे स्वत:चे दोन फिडींग पॉईंट तयार केले आहेत. त्यावरून पाणी भरून मतदारसंघातील गावांना ते टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहेत. माण खटाव मतदारसंघात पाणी आणले म्हणून काहीजण कायम दिंडोरा पिटत आहेत.तरीही प्रत्येक वर्षी नागरीकांना पाणीटंचाईचा सामना करावाच लागत आहे.

आजपर्यंत पाण्याचे राजकारण करून निवडणूका जिंकलेल्यांना ही पाणीटंचाई दिसत नाही का. नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यांची तहान भागवणे हे मी माझे कर्तव्य समजतो. म्हणून २०१२ पासून मतदारसंघातील मागेल त्या गावे, वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करत आहे.माण खटाव मतदारसंघातील जनतेसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी ठेवली असून मागेल त्यांना पाणी देणार आहे.

- शेखर गोरे (जिल्हा संपर्क प्रमुख, शिवसेना ठाकरे गट)

Edited By : Umesh Bambare

Shekhar Gore
Satara Congress News : कॉंग्रेस वर्किंग कमिटीतही डावलले; पृथ्वीराज चव्हाणांचे दिल्लीतील वजन घटलं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com