'एफआरपी'चे तुकडे केल्यास गाठ 'स्वाभिमानी'शी; रविकांत तुपकरांचा सहकारमंत्र्यांना इशारा

मंत्री बाळासाहेब पाटील यांना आमची विनंती आहे, की ३३०० रुपये पहिल्या उचलीची पहिली घोषणा सातारा जिल्ह्यातील कारखानदारांनी करावी.
Balasaheb Patil, Ravikant Tupkar
Balasaheb Patil, Ravikant Tupkarfacebook

दहिवडी : कायदा हा एकरकमी एफआरपीचा असताना सहकारमंत्रीच तीन तुकड्यात एफआरपी देण्याची भाषा करताना कायदा हातात घेतात. सहकारमंत्र्यांना ही भाषा शोभत नाही. तुम्ही कारखानदारांच्या बाजूचे आहात की शेतकऱ्यांच्या, असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला.

दहिवडी (ता. माण) येथील विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी संघटनेचे प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष माण तालुका अध्यक्ष राजू धनंजय महामूलकर, अभिजीत नायसे, राजू मुळीक, शकील मणेर आदी मान्यवर उपस्थित होते.

Balasaheb Patil, Ravikant Tupkar
एफआरपीचे तुकडे होण्यास केंद्र सरकारचे धोरणच जबाबदार....

रविकांत तुपकर म्हणाले, सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांना आमचं सांगणं आहे की, यावर्षी शेतकर्‍यांनी पहिली उचल एकरकमी ३३०० रुपये मागितली आहे. ३३०० रुपयांपेक्षा एक रुपयाही कमी घेणार नाही. ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना आमची विनंती आहे, की ३३०० रुपये पहिल्या उचलीची पहिली घोषणा सातारा जिल्ह्यातील कारखानदारांनी करावी. पावणेचार हजार रुपये प्रती टन शेतकऱ्यांच्या खिशात जातील, अशी व्यवस्था कारखानदारांच्या छाताडावर बसून आम्ही करुन घेऊ.

Balasaheb Patil, Ravikant Tupkar
एकरकमी ‘एफआरपी’साठी राजू शेट्टी आक्रमक : जेजुरीतून खंडोबा दर्शनाने एल्गार!

श्री. तुपकर पुढे म्हणाले, यावेळी सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. तुमची गाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आहे. आमची मागणी मान्य न केल्यास कारखान्यांची धुराडी पेटू दिली जाणार नाही हा आमचा इशारा आहे. ज्यांनी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात घालवली त्यांची दिवाळी आम्ही सुखासुखी होवू देणार नाही. त्या नेत्यांना शंभर टक्के शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे आंदोलन आम्ही दिवाळीत करु, असा इशाराही त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com