Jarange Patil News : जरांगे पाटलांसाठी कडाक्याच्या थंडीत मराठे जागले; ऐतिहासिक सभेत घोषणांनी शिवाजी स्टेडियम दुमदुमले

Karad Maratha जरांगे पाटील यांची सभा शुक्रवारी रात्री सात वाजता होणार होती. मात्र, त्यांना छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये यायला मध्यरात्री एक वाजला. तरीही मराठा समाज जागेवर बसून होता.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilsarkarnama
Published on
Updated on

-हेमंत पवार

Karad Maratha Reservation News : एक मराठा... लाख मराठा..., आरक्षण आमच्या हक्काचे... नाही कोणाच्या बापाचे...., कोण म्हणतंय देत नाय..., घेतल्याशिवाय राहात नायं..., छत्रपती शिवाजी महाराज की जय..., जय जिजाऊ... जय शिवराय... या ना अशा घोषणांनी सारा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा परिसर दुमदुमून गेला. निमित्त होते मराठा समाजाने आयोजित केलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य सभेचे. मध्यरात्री दोनपर्यंत ही सभा सुरू होती. कडाक्याच्या थंडीतही मराठा आबालवृद्ध सभेसाठी जागेवर बसून होते.

मराठा समाजाला Maratha Reservation ५० टक्क्यांच्या आत ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी यापूर्वी उपोषण केले. त्यानंतर त्यांनी आरक्षणासाठी २४ डिसेंबरची डेडलाइन सरकारला दिली आहे. त्यादरम्यान राज्यातील मराठा बांधवांशी संवाद साधण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्यासाठी ते पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाच्या दौऱ्यावर आहेत.

त्याअंतर्गत त्यांची कऱ्हाडला आज रात्री सभा होती. त्यासाठी मराठा समाजाच्या समन्वयकांनी स्टेडियममध्ये जोरदार तयारी केली होती. महिला, पुरुषांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, आकर्षक लाइटची व्यवस्था, ठिकठिकाणी लावण्यात आलेले भगवे झेंडे यामुळे चांगलीच वातावरण निर्मिती झाली. जरांगे पाटील यांच्या भाषणापूर्वी स्टेडियममध्ये उपस्थित आबालवृद्ध मराठा बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. कडाक्याच्या थंडीतही आबालवृद्ध स्टेडियममध्ये बसून होते.

जरांगे पाटील उशिरा आले तरीही....!

जरांगे पाटील यांची सभा शुक्रवारी रात्री सात वाजता होणार होती. मात्र, त्यांच्या दौऱ्यातून त्यांना छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये यायला वेळ झाला. ते मध्यरात्री एक वाजता स्टेडियममध्ये आले. त्यांच्या सभेसाठी सायंकाळी पाचपासूनच लोकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. ते मध्यरात्री एक वाजता आल्यानंतरही आबालवृद्ध मराठे जागचे हालले नाहीत. मध्यरात्री दोन वाजता सभा संपेपर्यंत मराठ्यांनी जागा सोडली नाही. Maharashtra Political News

Manoj Jarange Patil
Satara Political News : राष्ट्रवादी कुणाची... महादेव जानकरांनी स्पष्टच सांगितले

पोलिसांच्या मदतीला स्वयंसेवक

मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होणार होती. त्याचा विचार करून मराठा समन्वयकांनी पोलिसांच्या मदतीला स्वयंसेवकांची फौज उभी केली होती. त्यामुळे गर्दी नियंत्रणात यश मिळाले. मराठा समाजातील अनेक तरुणांनी स्वयंसेवक म्हणून कर्तव्य बजावले.

Edited By : Umesh Bambare

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : ''सध्या बिनकामाची कळपं एकत्र येतायत''; जरांगे पाटलांचा ओबीसी नेत्यांवर निशाणा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com