आमदार राधाकृष्ण विखेंच्या बैठकीने श्रीरामपुरातील राजकारण ढवळले

आमदार राधाकृष्ण विखे ( Radhakrishna Vikhe ) यांनी शहरात घेतलेल्या बैठकीने श्रीरामपुरातील राजकारण ढवळून निघाले आहे.
Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar News
Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar NewsParesh Kapse
Published on
Updated on

महेश माळवे

श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) - राज्यात नव्याने आलेल्या सरकारने नगरपालिका निवडणुकीला स्थगिती दिली. असे असताना मंगळवारी (ता. 19) रात्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी शहरात घेतलेल्या बैठकीने श्रीरामपुरातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांनी उल्लेख केलेला 'तो गट' आगामी सत्ता समीकरणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. ( The meeting of MLA Radhakrishna Vikhe stirred politics in Srirampur )

आमदार विखे यांनी माजी नगरसेवक जितेंद्र छाजेड यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, भाजपचे शहराध्यक्ष मारुती बिंगले, गणेश राठी, संदीप चव्हाण आदी उपस्थित होते. शत प्रतिशतचा नारा देत पालिकेत भाजपच्या झेंड्याखाली निवडणूक लढविण्याचे सूतोवाच यापूर्वीच आमदार विखे पाटील यांनी केले आहेत. मात्र, मध्यंतरीच्या काळात भाजप अंतर्गत दुफळी निर्माण होऊन चित्ते व बिंगले-राठी गट यांनी स्वतंत्र चूल मांडली. त्यातच विखे यांना मानणारा एक गटही भाजपमध्ये सक्रिय झाला. त्यातूनच तालुकाध्यक्षपदी पटारे यांची झालेली निवड जुन्या भाजप कार्यकर्त्यांना रुचली नसली तरी ती स्वीकारण्याची अपरिहार्यता त्यांच्या पदरी आली.

Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar News
Video: अजितदादांनी पुन्हा आमच्या सोबत यावे; राधाकृष्ण विखे पाटील

राज्यातील घडामोडीदरम्यान श्रीरामपुरातही राजकीय उलथापालथ सुरू आहे. काँग्रेस अंतर्गत कानडे व ससाणे गटात सुरू झालेली धुसपूस माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यापर्यंत पोहोचली असली तरी यावर त्यांनी फारसे भाष्य अद्यापही केलेले नाही. थोरात यांनी संगमनेरला पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रणनितीसाठी बोलाविलेल्या बैठकीला ससाणे गट अनुपस्थित होता.

दरम्यान, ससाणे गटाकडून होणाऱ्या आक्षेपार्ह टिप्पणी विरोधात आमदार कानडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांचे बंधू अशोक कानडे यांनीही पालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तसेच त्यांनी जवळ केलेला अंजूम शेख गटावरून ससाणे व कानडे यांच्यामधील दुरी वाढत चालल्याचे दिसत असले तरी याला ससाणे गटातील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याच्या भूमिकेची दुसरी किनारही आहे.

Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar News
लहू कानडेंची ससाणे गटावर अप्रत्यक्ष टीका : गद्दार म्हणणारे ढोंगी

नगराध्यक्ष निवड थेट जनतेतून होणार असल्याने शहरातील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. मंगळवारी झालेल्या बैठकीत विखे यांनी जनतेतून नगराध्यक्षाचा निर्णय झाल्यानंतर श्रीरामपुरात भाजपचा नगराध्यक्ष होऊ शकतो. शहरात भाजपचे वाढलेले प्राबल्य तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची उंचावलेली प्रतिमा कॅश करायची असेल तर 'तो गट' सोबत घ्यावा लागेल. सदर गटाने आपली भेट घेऊन चर्चा केली. ते भाजपात येण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितल्याने जुन्या पदाधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. त्याचवेळी विखे यांनी कोणावरही अन्याय न होऊ देता पावले उचलले जातील, असे स्पष्ट केले आहे.

मात्र, असे असले तरी विखे यांनी ही भूमिका जाहीर केल्यानंतर चित्ते यांनी भाजपची बैठक घेत मागील 30 ते 35 वर्षांतील संघर्ष व वाटचालीला पुन्हा उजाळा दिला. तसेच राठी यांनी इतर पक्षातील आयातीस विरोध दर्शविला आहे. त्यामुळे विखे यांनी घेतलेला निर्णय सत्ता संघर्षाचा नवा अध्याय ठरू नये, असेच काही राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar News
श्रीरामपूरसाठी भानुदास मुरकुटे, करण ससाणे आले एकत्र

भाजप विरुद्ध महाविकास आघाडी?

गत निवडणुकीत पालिकेत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी एकत्रित येत लढत दिली होती. मात्र, यावेळी विखे यांनी सांगितलेला 'तो गट' भाजपात दाखल झाल्यास भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा प्रयोग होऊ शकतो. आजची राजकीय परिस्थिती पाहता या दृष्टीने आधीच पावले टाकण्यास सुरवातही झाल्याची चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर भाजपातील नाराज उमेदवार आपला सवता सुभा ही मांडू शकतात. परंतु, हे बंड शमविणे विखे यांना फारसे अवघड नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com