Congress : देश वाचवण्यासाठी दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची गरज... रणजितसिंह देशमुख

Ranjitsinh Deshmukh देशमुख म्हणाले, खटाव तालुका हा क्रांतीकारकाचा तालुका असून चळवळ अथवा लढा उभारणे या तालुक्याला नवीन नाही.
Ranjitsinh Deshmukh
Ranjitsinh Deshmukhsarkarnama

Waduj News : अर्थव्यवस्था व लोकशाही खिळखिळी बनवणाऱ्या भाजपच्या BJP मोदी सरकारने Modi Government संपूर्ण देशातील सर्वसामान्य जनतेला बेकारी, महागाईच्या डोंगराखाली गाढले आहे. सामान्य जनता व देश वाचविण्यासाठी दुसरा स्वातंत्र्य लढा उभारण्याची गरज आहे असे मत महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे सरचिटणीस रणजितसिंह देशमुख Ranjitsinh Deshmukh यांनी व्यक्त केले आहे.

श्री. देशमुख यांनी वडुज येथे पत्रकाराशी संवाद साधला देशमुख बोलत होते. देशमुख म्हणाले, खटाव तालुका हा क्रांतीकारकाचा तालुका असून चळवळ अथवा लढा उभारणे या तालुक्याला नवीन नाही. लोकशाहीला घातक ठरणाऱ्या भाजपची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी कॉग्रेसचे विचार गावागावात पोचवणार आहे.

'हात से हात जोडो' अभियानाच्या माध्यमातून गाव तेथे शाखा उभारून कॉग्रस विचारसरणीची पाळेमुळे घट्ट करणार आहे. दरम्यान काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी जम्मू - काश्मीरच्या लाल चौकातील भारत जोडोच्या अभियान सांगता सभेतील इती वृत्तांत सांगितले.

Ranjitsinh Deshmukh
Satara BJP News: महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री भाजपचाच होणार... जयकुमार गोरे

ते म्हणाले, आंतकवाद्यांची दहशत, सुरक्षा यंत्रणेचा प्रभाव बाजूला करीत राहुल गांधीनी सामान्य जनतेमध्ये मिसळून जन भावना समजावून घेतल्या. या भारत जोडो यात्रेतील सभेमुळे भाजपच्या मोदी सरकारच्या पाया खालची वाळू सरकली आहे.

Ranjitsinh Deshmukh
Patan : कोथिंबिरीची पेंडी पारखून घेता... लोकप्रतिनिधी निवडताना जागरूकता कुठे जाते...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com