Satara BJP News: महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री भाजपचाच होणार... जयकुमार गोरे

Jaykumar Gore: भिलार (ता. महाबळेश्वर) येथे आयोजित करण्यात आलेल्या सातारा जिल्हा भाजप कार्यकारिणीची बैठक आणि दोन दिवसीय अभ्यासवर्ग शिबिराचे समारोप प्रसंगी आमदार गोरे बोलत होते.
Jaykumar gore
Jaykumar goresarkanama
Published on
Updated on

Bhilar News : बारामतीकरांच्या नादाला लागून शेताचा बांध न पाहिलेला आणि शेतकऱ्यांना त्रास होणारा गद्दार मुख्यमंत्री खुर्चीवर बसला आणि महाराष्ट्रावर मोठं संकट आलं. आम्हाला वेदना झाल्या; पण आता विचार करण्याची वेळ आली आहे. आगामी काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच BJP होणार, यासाठी काम सुरू आहे. आपणही आता कामाला लागू, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष अआमदार जयकुमार जयकुमार गोरे यांनी केले.

भिलार (ता. महाबळेश्वर) येथे आयोजित करण्यात आलेल्या सातारा जिल्हा भाजप कार्यकारिणीची बैठक आणि दोन दिवसीय अभ्यासवर्ग शिबिराचे समारोप प्रसंगी आमदार गोरे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, रवी अनासपुरे हे उपस्‍थित होते.

आमदार गोरे म्हणाले, 'ज्या योजनेतून अनेकांचे जीव वाचले, अनेकांच्या संसाराला हातभार लागला, ती मुख्यमंत्री साहाय्यता निधी योजना बंद करणारा पहिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्‍या रूपाने महाराष्ट्राने पाहिला. देवेंद्र फडणवीस यांनी अथक परिश्रमातून तयार केलेला अर्थसंकल्प वाचताना उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचे सुतकी चेहरे पाहण्यासारखे होते. आम्ही बहुमताने निवडून आलो; पण सत्तेच्या बाहेर राहावं लागलं.'

Jaykumar gore
Jaykumar Gore In Budget Session : डॉक्टरांचा सल्ला धुडकावत जयकुमार गोरे ‘वॉकर’च्या साहाय्याने पोचले अधिवेशनाला

जयकुमार गोरे म्हणाले, आपण यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार समजायचं, त्यांच्याच सातारा जिल्ह्यात आपला पक्ष त्यांनी वाढवला; पण 40 वर्षे एकहाती पाठीशी राहिलेल्या या सातारा जिल्ह्याला त्यांनी काय दिलं? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. सारी विकास केंद्रे बारामतीला नेली, कर्मवीर, यशवंतराव या संस्थांबरोबर त्यांनी औंधचे संस्थानही ताब्यात घेतलं. आता त्यांची मक्तेदारी मोडून काढण्याची वेळ आली आहे, असा घणाघात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी केला.

Jaykumar gore
Satara Politics : जनतेचे प्रेम होते तर लोकसभेला पडलात कसे? शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना डिवचलं..

जयकुमारनं लोकांसाठी बलिदान दिलं तर बिघडलं कुठं?

पवारांनी संस्थानिक, बँका, सभासद ताब्यात ठेवले आहेत. आपल्या ताब्यात काय आहे? पण त्यांच्या बालेकिल्ल्यातील सातारा जिल्हा बँकेने आजपर्यंत एकही नवा सभासद केला नाही. जिल्ह्यात आपली लढाई विचारांची आहे, ती राष्ट्रवादीबरोबर आहे, त्यांचा पाडाव करण्याची आपली मानसिकता असायला पाहिजे.’’ एवढ्या मोठ्या नेत्यांवर का बोलता असं मला अनेकदा सांगितलं जातं; पण मी का कुणाला भ्याव. चक्क माझा अपघात झाला तो बारामतीने केला, की फलटणने केला याच्या चर्चा सुरू झाल्या, असा मिस्कील टोला देऊन एका जयकुमारने लोकांसाठी बलिदान दिलं तर बिघडलं कुठं? असेही आमदार गोरे म्‍हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com