Kolhapur : मंत्रिमंडळ विस्तारासाठी विरोधकांना मोर्चे काढावे लागतील... सतेज पाटील

निवडणूक आयोगाकडून Election commission मतदार कार्ड Voter card आधारशी लिंक Adhar link up करण्याचे काम या महिन्याभरात पूर्ण झाले, तर निवडणूका सप्टेंबरपर्यंत September होतील, असा अंदाज श्री. पाटील यांनी व्यक्त केला.
Satej Patil, Eknath Shinde
Satej Patil, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : मंत्री मंडळाच्या विस्तारासाठी विरोधी पक्षांना आता मोर्चे काढावे लागतील, अशी खोचक टीका करून महाराष्ट्र हे गोव्यासारखे छोटे राज्य नाही. त्यामुळे हे राज्य फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चालू शकेल अशी स्थिती नाही. महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीने हे चिंताजनक आहे, असे स्पष्ट मत माजी मंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले आहे.

सतेज पाटील आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत जिथे शक्य होईल तिथे आघाडी करू, तर जेथे शक्य नाही तिथे स्वतंत्र लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. येणाऱ्या निवडणुकीत सत्ता बदलाचा परिणाम होणार नाही. जर निवडणूक आयोगाकडून मतदार कार्ड आधारशी लिंक करण्याचे काम या महिन्याभरात पूर्ण झाले, तर निवडणूका सप्टेंबरपर्यंत होतील, असा अंदाज त्यांनी वर्तवला.

Satej Patil, Eknath Shinde
सतेज पाटलांसाठी तरूण पोहचला थेट राहुल गांधींच्या घरी! नेत्यांकडे केली मोठी मागणी

भाजप आणि शिंदे गट एकत्र येत स्थापन केलेल्या नव्या सरकारला एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला नाही. याबाबत विचारले असता सतेज पाटील म्हणाले, सरकार स्थापन होऊन एक महिना झाला तरीही मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. म्हणजे भाजप आणि शिंदे दोन्ही गटाकडून कुठे तरी घोडे आडले असावे.

Satej Patil, Eknath Shinde
...तर २०२४ मध्ये सतेज पाटील कोल्हापूर उत्तरचे उमेदवार असतील : फडणवीसांचा गौप्यस्फोट

मंत्रिपदाला इच्छुकांची संख्या वाढल्याने विलंब होत असावा. आता मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी आम्हाला मोर्चे काढावे लागतील, असा टोलाही त्यांनी शिंदे सरकारला लगावला. महाराष्ट्र हे गोव्यासारखे छोटे राज्य नाही. त्यामुळे हे राज्य फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चालू शकेल अशी स्थिती नाही. महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीने हे चिंताजनक आहे, असेही ते म्हणाले. राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. तसेच प्रशासकीय बदल्या अडकल्या आहेत. यामुळे किमान दोन्ही गटाचे चार, पाच मंत्री तरी करा, असे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com