Ahmednagar Congress News : एकेकाळी वर्चस्व असलेल्या नगर जिल्ह्यातच काँग्रेसपुढे आव्हानांची मालिका ?

Congress Organization News : "नगर जिल्ह्यामध्ये काँग्रेस कुठे, असा प्रश्न काँग्रेसच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना पडलेला आहे."
Ahmednagar Congress News : एकेकाळी वर्चस्व असलेल्या नगर जिल्ह्यातच काँग्रेसपुढे आव्हानांची मालिका ?
Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : राज्यात सर्वात मोठा जिल्हा असलेला अहमदनगर एके काळी संपूर्णपणे काँग्रेसमय होता. जिल्ह्यातील चौदाही तालुक्यात काँग्रेसचे आमदार आणि कोपरगाव-नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते निवडून येत असत. मात्र, काळाच्या ओघात काँग्रेस पक्षाला ओहोटी लागली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उदयामध्ये, पक्षाचे झालेले दोन तुकडे यामध्ये अनेक नेते हे शरद पवार यांच्यासोबत गेले. तत्पूर्वी कर्जत-जामखेड आणि कोपरगाव आदी मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रवेश करत, येथील सत्ता अनेक वर्षे काबीज केली. (Latest Marathi News)

आजमितीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या निमित्ताने संगमनेर मतदारसंघ हा काँग्रेसचा मतदारसंघ आहे. त्यानंतर श्रीरामपूरमध्ये लहू कानडे हे काँग्रेसचे आमदार आहेत. बाकी उर्वरित मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचा मोठा वरचष्मा आहे. त्या खालोखाल भारतीय जनता पक्ष यांचे लोकप्रतिनिधी आहेत.

Ahmednagar Congress News : एकेकाळी वर्चस्व असलेल्या नगर जिल्ह्यातच काँग्रेसपुढे आव्हानांची मालिका ?
Manoj Jarange Patil : मराठा क्रांती मोर्चाचं वादळ पेटवणाऱ्या नगर जिल्ह्यात जरांगे पाटलांची तोफ धडाडणार !

शिवसेनेने नगर आणि त्याचबरोबर पारनेर हे मतदारसंघ अनेक वर्षे आपल्या हाती ठेवले. मात्र, हे विधानसभा मतदारसंघ आज त्यांच्या हातामध्ये नाहीत. एकंदरीत या परिस्थितीमध्ये काँग्रेसची पूर्व परंपरा पाहता, आज काँग्रेस केवळ नगर उत्तरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमध्ये पूर्ण ताकदीनिशी असली, तरी उर्वरित नगर जिल्ह्यामध्ये काँग्रेस कुठे, असा प्रश्न काँग्रेसच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना पडलेला दिसून येतो.

नगर जिल्ह्यामध्ये कर्जतमधून निंबाळकर, नगरमध्ये असिर सर, संगमनेरमध्ये भाऊसाहेब थोरात, लोणी-राहतामध्ये बाळासाहेब विखे, कोपरगावमध्ये शंकराव काळे, शंकरराव कोल्हे, नेवासेमधून यशवंतराव गडाख, शेवगावमधून मारुतराव घुले, श्रीरामपूरमधून जयंत ससाने, अकोल्यातून मधुकर पिचड, पारनेरमधून वसंतराव झावरे अशी अनेक मोठी नावे काँग्रेसच्या पाठीशी नगर जिल्ह्यात होती.

मात्र, काळाच्या ओघामध्ये नगर जिल्हा हा कधी कम्युनिस्ट विचारधारेत राहिला तर त्यानंतर भारतीय जनता पक्षाकडे वळला. आजपर्यंत नगर जिल्ह्यातील परिस्थिती पाहता काँग्रेसमधीलच राधाकृष्ण विखे आणि त्यांचे पुत्र खासदार सुजय विखे हे भाजपत आहेत, तर इतर अनेक नेते राष्ट्रवादी पक्षामध्ये आहेत.

या परिस्थितीमध्ये नगर जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व काय? हा मोठा प्रश्न आहे. निश्चितच काँग्रेसची विचारधारा ही तळागाळात पोहाेचलेली असली तरीही या विचारधारेचे नेतृत्व सक्षमपणे जिल्हा पातळीवर करण्यासाठी नेता आहे का? असा प्रश्न काँग्रेस पक्षातीलच कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. बाळासाहेब थोरात राज्याच्या राजकारणात आणि पक्षाच्या ध्येय धोरणात अग्रणी नेते मानले जातात. पक्षाने त्यांना प्रदेशाध्यक्ष, केंद्रीय कार्यकारिणीत आणि सध्या काँग्रेस पक्षाचे गटनेतेपद असे महत्त्वाचे स्थान दिले आहेत. सत्तेत असताना त्यांना कृषी, महसूलसारखी महत्त्वाची पदे दिली आहेत. त्यानंतरही नगर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष कुठेतरी मागे पडलेला आहे, अशी एकंदरीत परिस्थिती दिसून येते.

येणाऱ्या 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाहता बाळासाहेब थोरात यांना जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला सत्तेच्या राजकारणात आणणे, एक मोठे आव्हान आहे. थोरात यांनी यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. नगर जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार पाहता हे एक मोठे आव्हान काँग्रेस पक्षासमोर आहे. त्यात महाविकास आघाडी या अनुषंगाने काँग्रेसच्या पदरामध्ये जास्तीत जास्त जागा पाडून घेऊन, त्या निवडून आणणे हे सर्वात मोठे आव्हान थोरात यांच्यासमोर आहे. यात राष्ट्रवादी आपली ताकद पणाला लावला लावणार असून, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही आता जिल्ह्यामध्ये महत्त्वाची भूमिका घेत पुढे यावे लागणार आहे.

Ahmednagar Congress News : एकेकाळी वर्चस्व असलेल्या नगर जिल्ह्यातच काँग्रेसपुढे आव्हानांची मालिका ?
Karad NCP News : बाळासाहेब पाटलांनी जिंकली न्यायालयीन लढाई; ६२ कोटींच्या कामांवरील स्थगिती उठली

महाविकास आघाडीतील या तीनही पक्षांमध्ये आपल्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेणे आणि त्यानंतर त्या निवडून आणणे, हे या तीनही पक्षांसाठी महत्त्वाची गोष्ट असणार आहे. मात्र, यात सर्वात जुनी असलेली काँग्रेस कशी सामोरे जाईल आणि त्यासाठी बाळासाहेब थोरात कसे प्रयत्न करणार? ही मोठी उत्सुकता जिल्ह्याला लागून आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com