-हेमंत पवार
Karad NCP News : 'महाविकास'च्या काळात आमदार बाळासाहेब पाटील पालकमंत्री असताना त्यांनी कऱ्हाड उत्तर मतदारसंघासाठी ७९ कोटींची विकासकामे मंजूर केली होती. यातील ६२ कोटींच्या कामांना शिंदे, फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती. या विरोधात पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने त्या कामांवरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या Mahavikas Aghadi काळात कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी आमदार बाळासाहेब पाटील Balasaheb Patil यांनी ७९ कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केली होती. या कामांना सध्याच्या सरकारने स्थगिती दिली होती. त्यामुळे या कामाबाबत आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
याचिकेनंतर उच्च न्यायालयाने या १७ कोटी रुपयांच्या कामांवरील स्थगिती उठवली. त्त्यानंतर २५/१५ इतर ग्रामीण विकास योजनेअंतर्गत आठ कोटी, बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत बांधणे योजनेअंतर्गत एक कोटी आठ लाख, रस्ते व पूल दुरुस्ती परीक्षण कार्यक्रमांतर्गत एक कोटी १० लाख, जलसंधारण महामंडळाकडील छोटे सिंचन बंधारे योजनेअंतर्गत चार कोटी ही विकासकामे सुरू झाली.
मात्र, अल्पसंख्याकबहुल विकास योजना, अर्थसंकल्प योजना मार्च २०२२, जलसंधारण महामंडळाकडील मोठे साठवण बंधारे व वैशिष्ट्यपूर्ण योजना नगर विकास विभाग आदींच्या कामांवरील स्थगिती होती. ती स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे ६२ कोटी रुपयांच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्यामध्ये रस्ता, बंधारे, संरक्षक भिंत, शेड बांधणे, ओपन जीम, ओपन गटर्स, आरसीसी गटर्स, अभ्यासिका, कृष्णा पूल परिसर सुशोभीकरण करून वॉकिंग ट्रॅक तयार करणे, बगीचा विकसित करणे आदी कामांचा समावेश असून, या कामांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होऊन कामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
Edited By Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.