वाळू माफियांची मुजोरी; प्रांताधिकाऱ्यास धक्काबुक्की करून दिली जीवे मारण्याची धमकी..

फलटण शहर पोलिसांनी (Satara Police) आरोपी ननावरे यास अटक केली.
Crime news

Crime news

Sarkarnama
Published on
Updated on

फलटण : बेकायदा वाळूची वाहतूक करणारा हायवा ट्रकला अडविला आणि त्याकडे कागदपत्रे याबद्दल विचारणा केली म्हणून प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप (Shivajirao Jagtap) यांना जीवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की करण्याचा प्रकार फलटण शहरात घडला आहे. या प्रकरणी फलटण पोलिसांनी कैलास महादेव ननावरे (वय ४४, रा. झिरपे गल्ली, मंगळवार पेठ, फलटण) या संशयितास अटक केली आहे.

<div class="paragraphs"><p>Crime news</p></div>
DCP- 25 हजार, PI- 85 हजार, PSI-1500 : पोलिसांच्या हप्त्याची पोलखोल!

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल (ता.16 डिसेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास आपली बैठक आटोपून प्रांताधिकारी जगताप हे तहसीलदार समीर यादव अन्य अधिकाऱ्यांसमवेत जाधववाडीकडून फलटणकडे निघाले होते. त्यावेळी त्यांना एक हायवा ट्रक जाधवाडीकडून फलटणकडे जाताना दिसला. त्यांनी शंका आली म्हणून त्यांनी त्यास थांबवून चौकशी केली. त्याच्याकडे कागदपत्र नसल्याने वाळूचा व वाहनाचा पंचनामा, जप्ती पंचनामा करून गाडी ताब्यात घेण्यात आली. मात्र, ट्रक पोलिस ठाण्याकडे घेऊन जातांना गिरवी नाका येथे आल्यावर एक जण गाडीसमोर आडवा आला आणि तलाठी धेंडे यांना म्हणाला, "माझी गाडी मी घेऊन जाणार आहे." त्यावेळी त्यास जगताप यांनी आपण स्वतः प्रांताधिकारी असल्याचे सांगितले आणि गाडीत वाळू असून, त्यास परवाना नाही. त्यामुळे गाडी पोलिस ठाण्याला घेऊन निघालो आहे, असे सांगितले.

<div class="paragraphs"><p>Crime news</p></div>
बलात्काराचा गुन्हा न नोंदविण्यासाठी लाच घेणाऱ्या महिला PSI ला कृष्णप्रकाशांचा दणका

यावेळी त्यास नाव विचारले असता त्याने कैलास ननावरे असे नाव सांगतले. यानंतर त्याने प्रांताधिकारी जगताप यांच्या अंगावर धावून आला व मी तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणून त्यांना धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली. शासकीय कामत अडथळा आणल्या प्रकरणी स्वतः प्रांताधिकारी जगताप यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी लगेचच फलटण शहर पोलिसांनी आरोपी ननावरे यास अटक केली. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com