Solapur Congress Politics : सोलापुरचा काँग्रेसचा उमेदवार ठरवण्याची जबाबदारी 'या' नेत्यावर

Congress : काँग्रेससाठी सध्या चांगलं वातावरण आहे म्हणून कोणीही गाफिल राहू नका.
Solapur Congress Politics :
Solapur Congress Politics :Sarkarnama
Published on
Updated on

Solapur Politics : सोलापूर लोकसभा निवडणुकीचे २०२४ चे सर्व अधिकार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांना देण्याचा निर्णय काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील टिळक भवनात सोलापूर लोकसभा मतदारसंघाची (Solapur LokSabha Election) काँग्रेसची बैठक पार पडली. यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी मांडलेला ठराव एकमताने संमत करण्यात आला. (The responsibility of deciding the Congress candidate for Solapur is on this leader)

यावेळी काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, उल्हास पवार आदी नेतेमंडळी उपस्थित होते.

Solapur Congress Politics :
Gulabrao Patil News : राऊतांच्या कृत्यावरुन त्यांची संस्कृती कळते; गुलाबराव पाटील संतापले

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात काँग्रेससाठी सध्या चांगलं वातावरण आहे म्हणून कोणीही गाफिल राहू नका. येत्या काही दिवसताच लोकसभा निवडणूक लागणार आहेत. या निवडणुकांच्या तयारीला लागा. महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जनतेची कामं करा. संघटना मजबूत करा. संघटना मजबूत असेल तर आपल्याला कोणीही हरवू शकणार नाही. सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेसची आहे आणि ती कोणाला सोडण्याचा प्रश्न येतच नाही.

Solapur Congress Politics :
Nitesh Rane slams Supriya Sule : सुप्रियाताई, माझ्या बहिणीला भेटायला कधी जाणार ? ; राणेंचा सवाल ; पुण्यात लव्ह जिहाद..

दरम्यान पुणे लोकसभा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेसने (Congress) दावा केला आहे. यांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली. पण पुणे लोकसभेच्या जागेवर हक्क कायम ठेवण्यात आला. पुण्यात काँग्रेसची ताकद कशी आहे. हेही पदाधिकांऱ्यांनी मुंबईच्या बैठकीत मांडलं. त्याला दुजोरा देत नाना पटोले यांनी पुण्याच्या जागेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, पुण्याची जागा काँग्रेसच लढवणार, असं बैठकीत स्पष्ट केलं. पण यावरुन राष्ट्रवादी आणि काँग्रेस पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com