अहमदनगर - नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाकडून ( ईडी ) कारवाई करण्यात येत आहे. काँग्रेसकडून राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन करत ईडीच्या या कारवाई विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. अशातच अहमदनगर शहरातही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ( The state government changed only after showing fear of 'ED' )
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांना ईडीचा धाक दाखवून दबावतंत्राचे राजकारण करत असल्याने केंद्र सरकारचा निषेध करत आज (शुक्रवारी) अहमदनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आज काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार लहू कानडे, सचिन गुजर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, करण ससाणे, किरण काळे, सचिन गुंजाळ यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले, ईडी, सीआयडी, इन्कम टॅक्स' या संस्थांचा वापर करून देशात विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम सुरू आहे. विरोधातील लोकांचा छळ केला जात आहे. 'ईडी' चा धाक दाखवूनच राज्य सरकार बदलले आहे, असा आरोप थोरात यांनी केला. मात्र या सर्व गोष्टीची एक दिवस किंमत मोजावी लागेल असे थोरात म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, 'चुकीच्या पद्धतीने लोकांना माहिती देत केंद्र सरकारचा लोकांची दिशाभूल करत आहे. समाजामध्ये चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. राज्यातील सरकारी उलथून टाकण्याचा प्रयत्न ईडीच्या सहाय्याने झाला आहे. आरोप झालेला नेता भाजपमध्ये गेला की, तो निर्दोष होतो. लोकांना हे सर्व कळत आहे,' असा टोलाही त्यांनी लगावला.
'राहुल गांधी, सोनिया गांधी यांचाही याच पद्धतीने केंद्र सरकार छळ करत आहे. राज्यघटनेप्रमाणे आता सरकार चालेल की नाही असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. जाती-धर्माधर्मात भेद निर्माण केला जात आहे. हे देशाच्या हिताचे नाही. भविष्यात देश हा वेगळ्या मार्गाने जाईल. दुसऱ्या स्वातंत्र्याची चळवळ उभी करण्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. इथं गरिबाचे जगणं अवघड झाले आहे. अन्नधान्यावरही जीएसटी गोरगरिबांना लुटण्याचे काम सुरू आहे. या सर्व बाबीवर जनता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या काळामध्ये जिल्ह्यात पायी यात्रा करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.