शिवसेनेच्या 'त्या' भूमिकेवर काँग्रेस नाराज : बाळासाहेब थोरात म्हणाले...

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती निवडणुकीत भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे.
Uddhav Thackeray - Balasaheb Thorat
Uddhav Thackeray - Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - राज्यात शिवसेनेत दोन गट पडल्याने महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे गट व भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. असे असतानाही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती निवडणुकीत भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. ( Congress upset over Shiv Sena's 'that' role: Balasaheb Thorat said ... )

बाळासाहेब थोरात म्हणाले, राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेने एनडीएला पाठिंबा दिला. या संदर्भात त्यांनी सांगितले की, ज्यावेळी केंद्रातील भाजपचे सरकार असंविधानिक पद्धतीने विविध राज्यांतील सरकारे पाडत आहे. त्याची सर्वाधिक झळ शिवसेनेला बसलेली असताना त्यांनी भाजप उमेदवारा मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती निवडणूक ही लोकशाही वाचविण्यासाठीची लढाई आहे. त्यासाठी आम्ही यशवंत सिन्हांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे आतापर्यंतचे धोरण व काम करण्याची पद्धती पाहिल्यास लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही वाचविण्याच्या दृष्टीने त्यांनी निर्णय घेणे अपेक्षित होतं, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Uddhav Thackeray - Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात म्हणाले, आम्ही कायदेशीर लढाईसाठी सज्ज

ते पुढे म्हणाले की, आम्ही एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून लढा देत होतो. किमान समान कार्यक्रम घेऊन आम्ही सत्तेत आलो होतो. ज्यावेळी अशा अन्यायी पद्धतीने सत्ता बदल झाला. तरीही आम्ही शिवसेनेला साथ देण्याचे ठरविले. विधानसभा अध्यक्ष व बहुमत चाचणीच्या वेळी आम्ही एकत्रित काम केले. त्यामुळे असा निर्णय घेण्या अगोदर चर्चा होणे अपेक्षित होते. भाजपची कार्यपद्धती पाहिल्यावर त्यांनी भाजपच्या विरोधात ठामपणे निर्णय घेणे अपेक्षित होते. ही राज्यघटना व लोकशाही वाचविण्याची लढाई आहे. त्यानुसार काळजी व निर्णय घ्यायला हवा होता, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Uddhav Thackeray - Balasaheb Thorat
नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना हात जोडले ; ठाकरे-राऊतांवर भाष्य करण्याची गरज नाही !

गोव्यातील काँग्रेसचे काही आमदार फुटण्याची चिन्हे आहेत. यावर विचारले असता त्यांनी सांगितले की, भाजप हे सातत्याने करते ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी ते ज्या पद्धतीचा वापर करत आहेत तो दुर्दैवी आहे. अशा पद्धतीने लोकशाही पुढे जाणे मला कठीण वाटते, असे त्यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा स्वागत करताना त्यांनी सांगितले की, ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणूक घेऊ नये असा निर्णय आम्ही वेळोवेळी जाहीर केला होता. निवडणुका पुढे ढकलल्या आहेत तर ओबीसींना त्यांचा योग्य न्याय मिळाला पाहिजे. या पद्धतीने निवडणुका पुढे व्हाव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com