Ujani Dam Water Issue : ‘लाकडी निंबोडी’ची निविदा निघाली अन्‌ सोलापुरात उजनीचे पाणी पुन्हा पेटले!

जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली असून दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांनी भेटणार असल्याचे संघटनेच्या लोकांनी सांगितले
Ujani Dam Water Issue
Ujani Dam Water IssueSarkarnama
Published on
Updated on

मोहोळ (जि. सोलापूर) : इंदापूर (Indapur) तालुक्यातील बहुचर्चित लाकडी-निंबोडी (Lakdi-Nimbodi) जलवाहिनीसाठी उजनी धरणातून (Ujani Dam) सुमारे ०. ९० टीएमसी पाणी उचलण्यासाठीची ई निविदा ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध झाली आहे, त्यामुळे सोलापुरात (Solapur) पुन्हा एकदा उजनीचे पाणी पेटले आहे. जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली असून दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांना (Chief Minister) भेटणार असल्याचे संघटनेच्या लोकांनी सांगितले. तसेच, जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदारांचा निषेध करत त्यांना बांगड्यांचा आहेर देण्याचा इशारा शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी दिला आहे. (The tender for Lakdi-Nimbodi Water Scheme has been published)

उजनी धरणातून ०. ९० टीएमसी पाणी उचलून ते इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबाडी योजनेसाठी देण्यात येणार आहे. त्यासाठीची आर्थिक तरतूद मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली होती. त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय विशेषतः भाजपच्या लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोधाची भूमिका घेतली होती. सहाजिकच त्यावेळी भाजप विरोधी पक्षात असल्यामुळे भाजपचे लोकप्रतिनिधी विरोधात बोलत होते. आता मात्र शिंदे गटाच्या मदतीने राज्यात भाजप सत्तेवर आहे. त्यामुळे भाजपच्या लोकप्रतिनिधींचे मौन शेतकरी संघटनेच्या निशाण्यावर आले आहे.

Ujani Dam Water Issue
Anil Deshmukh News : अनिल देशमुखांना लागली मतदारसंघाची ओढ : म्हणाले, ‘प्रथम मी काटोलला जाणार...’

बहुचर्चित लाकडी-निंबोडी प्रकल्पाची ई निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनानी आक्रमक होत जिल्ह्यातील सर्व आमदारांचा व दोन खासदारांचा निषेध व्यक्त करीत त्यांना बांगड्याचा आहेर करणार असल्याचे सांगत, दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रकरणी भेटणार आहोत. ही योजना रद्द करण्यासाठी त्यांना साकडे घालणार आहोत.त्यांच्या कडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आक्रमक भूमिका घेऊन जिल्हाभर आंदोलन केले जाईल अशी भूमिका सर्व शेतकरी संघटनांनी घेतली.

Ujani Dam Water Issue
Anil Deshmukh News: पवारसाहेब सध्या मुंबईबाहेर...भेटीसाठी मी त्यांची वाट पाहतोय... : देशमुखांना आपल्या नेत्याला भेटण्याची ओढ

शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्ह्यातील नेते आज (ता. ३ जानेवारी) मोहोळ येथील शासकीय विश्राम गृहावर एकत्र आले होते. त्यावेळी त्यांनी उजनीच्या पाण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली. उजनीचे पाणी लाकडी-निंबोडी योजनेसाठी नेण्याची निविदा फसवून काढली आहे. या निर्णयाविरोधात आज सर्वपक्षीय नेते एकत्र आले होते. सर्वांच्या चर्चेतून ही योजना तात्काळ रद्द करावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन सुरुवात करण्याचे ठरले आहे. त्यांनी दखल घेतली नाही, तर जिल्हाभर आंदोलन उभारण्याचा निर्धार उजनी संघर्ष समिती आणि सर्व शेतकरी संघटनांनी ठरवले आहे.

Ujani Dam Water Issue
नगरच्या नामांतराला भाजपचे मंत्री विखे पाटलांचा विरोध : म्हणाले नामांतरापेक्षा...

गेल्या २५ वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेसाठी ३० डिसेंबर रोजी २१९ कोटी ७९ लाख रुपयाची ई निविदा प्रसिद्ध झाली आहे. या योजनेद्वारे १७ गावांतील ७ हजार २५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

Ujani Dam Water Issue
Jagtap-Tilak News : दुर्धर आजारातही पक्षनिष्ठा शिकविणारे दोन झुंजार नेते भाजपने १२ दिवसांत गमावले

या वेळी अतुल खुपसे, सोमेश क्षीरसागर, माऊली हळणवर, सुहास पाटील, सचिन पाटील, विश्रांती भूषणर, मुबिना मुलाणी, शंकर भोसले, अनिल पाटील, अशोक भोसले, महादेव वाघमोडे, प्रा. एस. एम. गायकवाड, भारत जाधव, चंद्रकांत निकम, दिलीप ननवरे, गणेश बिराजदार, किसनराव खोचरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com