Anil Deshmukh News: पवारसाहेब सध्या मुंबईबाहेर...भेटीसाठी मी त्यांची वाट पाहतोय... : देशमुखांना आपल्या नेत्याला भेटण्याची ओढ

अनिल देशमुख यांना जामीन देताना मुंबईबाहेर न जाण्याची अट घालण्यात आलेली आहे.
Sharad Pawar-Anil Deshmukh
Sharad Pawar-Anil DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे सध्या मुंबईच्या बाहेर आहेत. ते मुंबईत आल्यानंतर मी त्यांची भेट घेईन, मी त्यांची वाट पाहतोय, अशा शब्दांत माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी पवारांच्या भेटीची आतूरता लागल्याचे सांगितले. (I am waiting for Sharad Pawar : Anil Deshmukh)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर आर्थर रोड कारागृहातून देशमुख यांची २८ डिसेंबर रोजी सुटका झाली. त्यानंतर ईडीच्या कार्यालयात हजेरी लावण्यासाठी देशमुख आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपण पवार यांना भेटण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.

Sharad Pawar-Anil Deshmukh
नगरच्या नामांतराला भाजपचे मंत्री विखे पाटलांचा विरोध : म्हणाले नामांतरापेक्षा...

शरद पवार हे सध्या मुंबईच्या बाहेर आहेत, तर अनिल देशमुख यांना जामीन देताना मुंबईबाहेर न जाण्याची अट घालण्यात आलेली आहे. त्यामुळे कारागृहाबाहेर आल्यानंतरसुद्धा शरद पवार आणि अनिल देशमुख यांची अजूनही भेट होऊ शकलेली नाही. त्यामुळेच देशमुख यांनी आपण पवार यांची वाट पाहतोय, असे म्हटलेले आहे.

Sharad Pawar-Anil Deshmukh
Jagtap-Tilak News : दुर्धर आजारातही पक्षनिष्ठा शिकविणारे दोन झुंजार नेते भाजपने १२ दिवसांत गमावले

देशमुख म्हणाले की, माझ्यावर शंभर कोटी वसुलीचा आरोप झाला होता. पण, माझ्यावर जे न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले होते. त्यात एक कोटी ७१ लाख रुपयांचा उल्लेख होता. म्हणजे आरोप शंभर कोटींचा झाला आणि आरोपपत्रात तो १ कोटी ७१ लाखांवर आला. त्याच्यातही काही तथ्य नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपप्रकरणी सकृतदर्शनी कोणतेही पुरावे नाहीत, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com