BJP News : धनंजय महाडिकांनी शब्द खरा केला : परिचारकांच्या विरोधात समाधान आवताडेंना पाठबळ

BJP News : श्री संत दामाजी व भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर मतदार संघात नव्या राजकीय घडामोडी होत होत आहेत.
Samadhan Awatade
Samadhan Awatade Sarkarnama

मंगळवेढा : श्री संत दामाजी व भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर मतदार संघात नव्या राजकीय घडामोडी होत होत आहेत. आता भाजप आमदार समाधान आवताडे यांना भाजप (BJP) खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे पाठबळ मिळणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत.

सहा महिन्यापूर्वी झालेल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Co-operative Sugar Factory) आवताडे यांना पराभूत करण्यासाठी भालके व परिचारकांच्या समर्थकांनी एकत्र येत समविचारी आघाडी स्थापन केली होती. या आघाडीला दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्याच्या ऐकून पाठबळ दिले याच समविचारी आघाडीच्या माध्यमातून समाधान आवताडे (Samadhan Awatade) यांना कारखाना निवडणुकीत पराभूत केले.

Samadhan Awatade
Pune News : मोठी बातमी : मंगलदास बांदल यांना पावणेदोन वर्षांनी जामिन मंजूर

ही सल अवताडे समर्थकांच्या मनामध्ये राहिले आहे. त्यानंतर टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार प्रशांत परिचारक व राजन पाटील यांच्या गटाला धनंजय महाडिक यांच्या गटाने पराभूत केले. दोन्ही साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाला पराभूत करण्यासाठी त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी अप्रत्यक्षरीत्या मदत केल्याची सल दोन्ही नेत्याला लागून राहिली आहे.

यामध्ये आवताडे यांच्या पराभवाला परिचारक गट कारणीभूत ठरला तर महाडिक यांच्या गटाला विजयी होण्यासाठीचा संघर्ष परिचारकामुळे करावा लागला ही सल मनात राहिली त्यामुळे जिथे परिचारक गट असेल तिथे विरोध करण्याची भूमिका महाडिक गटाने स्पष्ट करून दाखवली.

दामाजी कारखान्याच्या निवडणुकीनंतर समविचारी गटाने ग्रामपंचायत निवडणुकीत देखील अपेक्षित यश मिळवल्यामुळे मारोळी येथे झालेल्या सत्कार समारंभात भगीरथ भालके यांनी समविचारी आघाडीला का पाठिंबा दिला याचे कारण स्पष्ट केले. त्यामुळे जवळपास मंगळवेढ्यातील या पुढच्या निवडणुका भालके परिचारक समर्थक एकत्रित येऊन लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे महाडिकांनी देखील आता भीमा कारखान्याच्या विजयाच्या सत्कार समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी चेअरमन विश्वराज महाडिक यांनी आवताडे यांच्या संपर्क कार्यालयात येऊन त्याबाबतचे निमंत्रण दिले.

Samadhan Awatade
Dr. Ashish Deshmukh यांच्या भूमिकेने निवडणुकीवर काही फरक पडणार नाही !

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ अवताडे, सुहास पवार, अॅड धनंजय जाधव, सत्यजित सुरवसे आदी उपस्थित होते. या भेटीत या भेटीत सत्काराच्या निमंत्रणा बरोबर राजकीय चर्चा झाल्या या भेटीचा तपशील माध्यमात आला नसला तरी या पुढील काळात भाजप खासदाराचे आमदारांना मदत राहणार असल्याचे जवळपास स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे या पुढच्या निवडणुका देखील आता रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहेत. तसचे ज्या-ज्या ठिकाणी परिचारक यांचे पॅनल असे त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवणार असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवडणुकीत अधिक रंगत येणार असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com