Ajit Pawar News : आमच्यापासूनच भाकरी फिरवायला सुरुवात करणार; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Pune NCP : पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पक्ष संघटनात लवकरच बदल
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur NCP News : कोणत्याही मतदारसंघावर कुणाचीही मक्तेदारी नाही. बूथनिहाय नियोजन करून काम केल्यास कुठल्याही मतदारसंघातून कुणीही निवडून येऊ शकतो. विविध संघटनांमध्ये काम करण्यास युवकांना मोठी संधी आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेत भाकरी फिरविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात आमच्यापासूनच करण्यात येणार आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले.

Ajit Pawar
Bhagatsingh Koshyari News: भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला; कारण काय?

कोल्हापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते. यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पक्षाच्या स्थितीबाबत माहिती दिली. पवार म्हणाले, राष्ट्र्वादीची स्थापना झाली त्यावेळी कोल्हापूरमधून पाच आमदार आणि दोन खासदार निवडून आले होते. त्यावेळी तीन मंत्रीपदे जिल्ह्याला दिली होती.

आता त्यात वाढ झाली पाहिजे. त्यासाठी बूथनुसार कमिट्या झाल्या पाहिजे. मतदारसंघातील विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी बूथनिहाय काम केले पाहिजे. मी बारामतीत विरोधकांचे डिपोजीट जप्त करतो. त्यासाठी प्रत्येक बुथनिहाय काम केलेले असते. विविध समितीचे मेळावे घेतले जातात. अनेक मार्गाने कार्यकर्त्यांची कामे करतो.

Ajit Pawar
Nitin Gadkari On Contractor News : कंत्राटदारांनो काम व्यवस्थीत करा, नाहीतर कारवाई पक्की समजा..

आता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपासून भाकरी फिरविण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, "विद्यार्थी संघटनेत २२ ते २८ वयातील पदाधिकारी असावेत. युवकचा अध्यक्ष २८ ते ३४ वर्षांपर्यत असावा. काळानुसार पदाधिकाऱ्यांना वेगवेगळी संधी दिली पाहिजे. आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेत भाकरी फिरविण्याची काम करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या झालेल्या बैठकीत काही निर्णय झाले. त्यात आमच्यापासून भाकरी फिरविण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. बारामती, पुणे (Pune), पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवडमध्ये नविन नेतृत्व पुढे आणण्याचे निर्णय झाले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातही होणार आहे. ज्येष्ठांनी युवकांना मार्गदर्शन करावे."

Ajit Pawar
Bhagatsingh Koshyari News: भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला; कारण काय?

बूथवर काम केल्यास कुठल्याही मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार निवडून येतील, असा दावाही पवार यांनी यावेळी केली. अजित पवार म्हणाले, "कर्जत जामखेड राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदारसंघ नव्हता. तो भाजपच्या ताब्यातच होता. तर आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळी त्यांना कुठला मतदारसंघ द्यायचा यावर विचार झाला. त्यांना सांगतले की बारामतीत मी आहे.पुणे जिल्ह्यात सुप्रिया सुळे (Supriya Sule) खासदार आणि मी आमदार आहे. त्यामुळे दुसऱ्याच जिल्ह्यात जावे लागेल. त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की रोहित यांना कर्जत जामखेडमधून निवडणूक लढवतील. त्यानुसार रोहित यांनी तेथे बूथनुसार काम केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नसतानाही ते काही हजार मतांनी निवडून आले."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com