Maan BJP News : जनतेची लूट केल्याने त्यांना सत्तेतून बाहेर जावे लागले : विखे- पाटील

Radhkrishna Vikhe Patil आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून म्हसवडच्या ८० कोटींच्या पाणीपुरवठा योजना आणि इतर २२ कोटींच्या विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी राधाकृष्ण विखे- पाटील बोलत होते.
Udhav Thackeray, Radhkrishna Vikhe Patil
Udhav Thackeray, Radhkrishna Vikhe Patilsarkarnama
Published on
Updated on

-सल्लाउद्दीन चोपदार

Maan BJP News : अडचणीत सापडलेल्या बळीराजाला मदत करण्यात आमचे सरकार कायमच तत्पर राहिले आहे. १२ कोटी जनतेला आरोग्य योजनांचा लाभ देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. ४० वर्षे सत्तेत असणाऱ्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी सध्या त्यांचा थापा मारण्याचा उद्योग सुरू आहे. त्यांनी जनतेची लूट केल्याने सत्तेतून बाहेर जावे लागले. आता त्यांचे समूळ उच्चाटन करा, असे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी केले.

दहिवडीला Dahiwadi दहा कोटी खर्च करून शेळी- मेंढी संशोधन केंद्र आणि दीड महिन्यात म्हसवड येथे तहसील कार्यालय सुरू करणार असल्याची घोषणा राधाकृष्ण विखे- पाटील RadhaKrishna Vikhe-Patil यांनी केली. आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore यांच्या प्रयत्नातून म्हसवडच्या ८० कोटींच्या पाणीपुरवठा योजना आणि इतर २२ कोटींच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, राहुल कुल, सोनिया गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अॅड. भास्करराव गुंडगे, मनोज घोरपडे, अर्जुन काळे, अरुण गोरे, शिवाजीराव शिंदे, धनंजय चव्हाण, दादासाहेब काळे आदी उपस्थित होते.

श्री. विखे -पाटील म्हणाले, ‘‘म्हसवडसाठी ८० कोटींची नळ पाणीयोजना आमदार गोरे यांच्या कल्पक नेतृत्वामुळे मंजूर झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून २०२४ पर्यंत सर्व घरांमध्ये पिण्याचे पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Udhav Thackeray, Radhkrishna Vikhe Patil
Maan Political News : माणचा आमदार, माढ्याचा खासदार ठरवणारे रामराजे कोण...जयकुमार गोरेंचा सवाल

जनतेच्या मनातील सरकार राज्यात आल्याने लोकहिताचे अनेक निर्णय घेतले जात आहेत. एक रुपयात पीकविम्यासह शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत केली जात आहे. भकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री ऑनलाइन होते.’’

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com