Sangli News : शिवशक्ती परिक्रमा यात्रेनिमित्त भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे सांगली जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी मुंडे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी गराडा घातला होता. मात्र याच गर्दीत संधी साधत चोरट्यांनी हात धुवून घेतले. अज्ञात चोरट्यांनी गर्दीतील काही कार्यकर्त्यांचे सोने आणि रोख रक्कम लंपास केले. यामुळे पंकजाताईंसाठी जमलेली गर्दी मात्र कार्यकर्त्यांना चांगलीच महागात पडली. (Latest Marathi News)
पंकजाताईंच्या या कार्यक्रमादरम्यान तब्बल सहा तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 32 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केला. यामुळे या कार्यक्रमाची जास्त चर्चा या चोरीच्या घटनेमुळे होत आहे. चोरीच्या घटनेनंतर या प्रकरणी आता किशोर प्रकाश डोंबे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 'बुधवार सहा सप्टेंबर रोजी सांगलीच्या विट्यातील लकडे प्लाझा समारे पंकजाताई मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेचे जोरदार स्वागत झाले. पंकजाताईंच्या स्वागतासाठी थांबलेल्या नागरिकांच्या गर्दीत अज्ञात चोरट्यांनी आपला कार्यभाग साधून घेतला. सोन्याच्या चेन आणि रोख रक्कम चोरून चोरटे पसार झाले.
विक्रम विठ्ठल भिंगारदेवे यांच्या गळ्यातील ६० हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन, दत्तात्रय शिवदास तारळकर यांची ३० हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन, किशोर डोंबे यांची ३० हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन व प्रसाद हरिश्चंद्र शिंदे यांचे रोख १२ हजार रूपये, असा एकूण एक लाख ३२ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या घटनेची विटा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.