Anil Deshmukh on NCP : शिवसेना आणि आमच्या केसमध्ये मोठी फरक, निकाल आमच्याच बाजूने लागणार !

Prafull Patel : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विदर्भातील सर्वात मोठे नेते प्रफुल्ल पटेल होते.
Anil Deshmukh
Anil DeshmukhSarkarnama

Nagpur NCP Political News : पक्ष आणि चिन्ह यासाठी आमची न्यायालयीन लढाई सुरू आहे, त्यामुळे बहुतेकांना असं वाटतं की शिवसेनेचं ज्याप्रमाणे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं गेलं. तसंच राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत होईल. पण अशी केवळ शंका काही लोकांना आहे. मात्र शिवसेना आणि आमच्या केसमध्ये मोठा फरक आहे, असे माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख म्हणाले. (The biggest leader of NCP in Vidarbha was Praful Patel)

आज (ता. आठ) नागपुरात आमदार देशमुख पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, केंद्रात भाजपचे सरकार असल्याने प्रफुल्ल पटेल यांना वाटत असेल की, भाजपच्या दबावाखाली निवडणूक आयोग त्यांच्या बाजूने निर्णय देईल. मात्र सबळ पुरावे आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. त्यामुळे निर्णय आमच्या बाजूने लागेल असा आम्हाला विश्वास आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) विदर्भातील सर्वात मोठे नेते प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) होते. म्हणजे त्यांनी विदर्भात जे काही काम केले, याचा अर्थ त्यांच्या कामावर त्यांना शंका आहे का, असा प्रश्‍न विचारला असता, ते स्वतःच्या कामाबद्दल शंका घेतात की काय, असे वाटू लागले आहे. मी विदर्भात राष्ट्रवादी पक्ष वाढवू दिलं नाही, असं त्यांचे म्हणणं असेल, तर ते चुकीचं आहे. कारण त्यांच्याच नेतृत्वात आम्ही सगळेजण काम करत होतो, ते आमचे नेते होते, असे देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती यात्रेबद्दल आमदार देशमुख म्हणाले, भाजपने पंकजा मुंडे यांना शंभर टक्के बाजूला केलं आहे. त्यामुळे त्यांचं नाराज होणे स्वाभाविक आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांचा सुर बघितला, तर त्या भाजपमध्ये समाधानी आहेत, असे वाटत नाही. त्यामुळे त्या या परिस्थितीत काय निर्णय घेतात याकडे आमचं लक्ष आहे.

Anil Deshmukh
Anil Deshmukh On Jalna Andolan: मी गृहमंत्री राहिलेलो आहे; काही माहिती मलाही मिळते, अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट !

ओबीसींवर अन्याय न होऊ देता मराठा समाजाला न्याय कसा देता येईल, याचे प्रयत्न राज्य सरकारने केले पाहिजे. जर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला तर त्याच्या भडका राज्यभर उडेल. आत्ताच तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. जर ओबीसीतून आरक्षण दिले गेले, तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. केंद्र सरकारने पुढाकार घेऊन संसदेत आरक्षण मर्यादा वाढविण्याची भूमिका घेतली तर हा प्रश्न सुटेल. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली असल्याचे अनिल देशमुख म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com