Rajendra Phalke on NCP: लोकसभेसाठी माझं नाव आल्याने काही जणांकडून हे कृत्य; गद्दार म्हणणाऱ्या विरोधकांवर फाळकेंचा आरोप

Ahmednagar Politics: राजेंद्र फाळके यांच्या घराच्या वॉल कंपाउंड ला काळे फासत 'गद्दार' असे लिहीत फाळके यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
Ahmednagar Politics:
Ahmednagar Politics:Sarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar : ''बाजार समितीच्या निवडणुकीत नऊ नऊ सम मतदान सदस्य होते. वास्तविक दोन्ही बाजूने समसमान मते पडून ईश्वर चिठ्ठीद्वारे निकाल होणे अपेक्षित होते. मात्र सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या एका सदस्याचे मत बाद झाले तर उपसभापती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराला एक मत जास्त पडले. यावरून राष्ट्रवादीचे एक मत फूटल्याचं स्पष्ट होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके (Rajendra Phalke) यांच्या घराच्या वॉल कंपाउंड ला काळे फासत 'गद्दार' असे लिहीत फाळके यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी या कार्यकर्त्यांनी 'रोहित दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशा घोषणाही दिल्या.

Ahmednagar Politics:
Eknath Shinde on Abdul Sattar : मुख्यमंत्र्यांनी सत्तारांचे कान टोचले ; कारभार सुधारा ; तुमचे जे चालले ते वाईट..

या घटनेवर बोलताना फाळके बोलताना म्हणाले की, झालेली घटना ही तशी किरकोळ अशी आहे. आता यावर लोकप्रतिनिधी सांगतील त्या प्रमाणे सदस्यावर पक्षशिस्त भंगाची कारवाई केली जाईल, असे सांगत चेंडू एक प्रकारे आ. रोहित पवार यांच्याकडे ढकलला. लोकप्रतिनिधी सांगतील त्यांची कुणाचीही गय न करता शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असं राजेंद्र फाळके यांनी सांगितलं. (Ahmednagar Politics)

राजकारणात चढ-उतार हे असतातच. पारनेर बाजार समिती राष्ट्रवादीने जिंकली तर खरेदी विक्री संघात पराभव पदरात पडला. त्याचबरोबर अकोल्यामध्येही दूध संघात पराभव झाला तर खरेदी विक्री संघात राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाला. त्याच पद्धतीन कर्जत मधील घटना असून राजकारणात चढउतार असतातच. मात्र मी कर्जत मध्ये राहत असल्याने काही गोष्टी होत असाव्यात अशी सावध प्रतिक्रिया फाळके यांनी दिली. (Maharashtra Politics)

Ahmednagar Politics:
NCP Candle March against Brijbhushan Singh : ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आता राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक..

कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने आंदोलन केलं त्यांचीही बाजू ऐकून घेतली जाईल. अनेकदा कार्यकर्ते प्रसिद्धीसाठी वेगवेगळे स्टंट करतात. जामखेड मध्येही आमदार राम शिंदे यांना फेसबुक लाईव्ह करत थेट जिवे मारण्याची धमकी एकाने दिली आणि आपण रोहित पवारांचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले. मात्र रोहित पवार असं थोडंच कोणाला सांगणार आहे का असे म्हणत फाळके यांनी कार्यकर्ते प्रसिद्धीसाठी कधीकधी असे स्टंट करत असतात असे मत व्यक्त केले. त्याच बरोबर कर्जत मधे आपल्या निवास्थानाबाहेर घोषणा देणाऱ्यांतील काही जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे नमूद केले.

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे काही संचालकांची मते फुटली होती. त्यानंतर कर्जत बाजार समितीमध्येही एक मत फुटले. त्यातून पक्षातील काही कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर राजेंद्र फाळके यांच्या बद्दल तक्रारी केल्या असल्याचे बोलले जाते. याबद्दल फाळके यांना विचारले असता, त्यांनी व्यक्ति चर्चेत आली की त्याला हा विरोध होणारच असतो. लोकसभेसाठी माझे नाव सध्या चर्चेत आहे. चांगले काम करणाऱ्याला विरोध हा होतच असतो अशी प्रतिक्रिया राजेंद्र फाळके यांनी दिली.

Ahmednagar Politics:
Congress Vs BJP : काँग्रेस नेत्याचं मोठं विधान, ''भाजपमुक्त महाराष्ट्रासाठी आम्ही...''

मी काही कर्जत मार्केट कमिटीचा सदस्य नव्हतो. त्याचबरोबर यापूर्वी कर्जतच्या तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यानंतर त्यांना तातडीने पक्षातून काढण्यात आले. त्याच पद्धतीने आता लोकप्रतिनिधी जे सांगतील त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष म्हणून आपण तातडीने शिस्तभंगाची कारवाई करून असं फाळके म्हणाले. जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाकडे या सर्व घटनांचा अहवाल पाठवला जाईल अशी माहिती त्यांनी दिली

राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून अपयशाचे खापर माझ्यावर फोडणार्यांनी त्यांना यश मिळत असताना त्याचे श्रेयही द्यावे असाही टोला राजेंद्र फाळके यांनी कुणाचेही नाव न घेता लगावला आहे. एकूणच जिल्हा सहकारी बँक आणि त्यानंतर कर्जत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक आणि सदस्य यांनी पक्षविरोधी कारवाया केलेल्या असताना आता राष्ट्रवादी पक्षांतर्गत पक्ष पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये काही सुप्त संघर्ष सुरू आहे का अशी चर्चा होत आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com