Sharad Pawar News : 'अजितदादा आमचेच नेते..' ; शरद पवारांच्या विधानावर सर्वपक्षीय नेत्यांना काय वाटतं ? ; कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम...

NCP News : राष्ट्रवादीत वैचारिक मतभेद आहेत, असे समजू," असे मुनगंटीवार म्हणाले.
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : 'अजित पवार आमचेच नेते,' असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी म्हटलं आहे. पवारांच्या विधानाचा अर्थ राजकीय विश्लेषक लावत आहेत.

भाजपचे नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. "शरद पवार, सुप्रिया सुळे हे अजितदादा आमचेच नेते असल्याचं म्हणत असतील तर ही भूमिका सुळे आणि पवारांना मान्य असेल असे समजू. जर मान्य नसेल तर राष्ट्रवादीत वैचारिक मतभेद आहेत, असे समजू," असे मुनगंटीवार म्हणाले.

पवार वैचारिक हातोडा मारतील : बावनकुळे

"या निमित्ताने अजितदादांची भूमिका म्हणजे राष्ट्रवादीची भूमिका आहे, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विरोधक जे स्वप्न रंजनात आहेत. त्यावर शरद पवार वैचारिक हातोडा मारतील असं वाटतं. लवकरच शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांना आगामी काळात ते पाठिंबा देतील," असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
Bawankule On Sanjay Raut: ठाकरेंचे भरकटलेले 'यान' काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल; बावनकुळेंचा राऊतांना चिमटा

कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम :अंबादास दानवे

शरद पवारांनी बारामतीत केलेल्या विधानामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांच्या पक्षातील घडामोडीबद्दल बोलण्याचा त्यांना अधिकार असल्याचे मत विधान परिषेदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.

पवार आघाडीसोबतच आहेत :वडेट्टीवार

"काँग्रेसने शरद पवार यांच्या वक्तव्याचा अर्थ काढावा, यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी याचा अर्थ काढावा, शरद पवार बोलत असतील तर याचा अर्थ आम्ही का काढावा ? शरद पवार महाविकास आघाडीसोबतच आहेत," असा ठाम विश्वास विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केला आहे.

"शरद पवारांच्या वक्तव्यानं आम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. आमच्या सोबत अनेक आघाड्या आहेत. शरद पवारांसह इतरही अनेक आघाड्या आहेत. इंडिया आघाडीच्या पाठीमागे जनता उभी आहे. या सरकारची लोकप्रियता संपली आहे, हे सरकार ED, CBI च्या जोरावर चालणारं सरकार आहे.", असेही वडेट्टीवार म्हणाले.

अजित पवार लोकनेते : अनिल पाटील

शरद पवार यांनी काय हेतूने हे विधान केले याची कल्पना नाही. महाराष्ट्रात अजितदादांमागे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे शरद पवारही येणाऱ्या काळात निर्णय घेतील, असे वाटते. अजित पवार लोकनेते ठरत आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी ते विधान केलं असावे, अशी प्रतिक्रिया अजितदादा गटाचे नेते, मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केली.

Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar News : शरद पवारांचे मोठं विधान ; अजित पवार हे आमचेच नेते, राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही..

अजितदादांबाबत शरद पवार काय म्हणाले ?

शरद पवार यांनी बारामतीत माध्यमाशी संवाद साधताना त्यांनी राजकीय धुरीणांनाही बुचकळ्यात पाडणारे विधान केले आहे. काल (गुरुवारी) सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आमचे नेते आहेत, असे विधान केले होते. त्यावर तुमचं काय मत आहे? असा सवाल पवारांना करण्यात आला.

त्यावर फूट म्हणजे काय? पक्षात फूट कधी होते? जर पक्षातील एक गट वेगळा झाला तर देश पातळीवर फूट पडली म्हणता येते. पण तशी स्थिती येथे नाही. पण कुणी पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर तसा निर्णय घेण्याचा लोकशाहीत त्यांना अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे फूट पडली असं म्हणता येत नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com