असा झाला सदाशिव लोखंडेंचा चेंबूर ते शिर्डी राजकीय प्रवास

सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande ) यांनी अहमदनगर जिल्ह्यातून निवडणूक लढविली आणि भाजपकडून ( BJP ) सलग तीन वेळा आमदार व शिवसेनेकडून ( Shivsena ) सलग दोन वेळा खासदार होण्याचा चमत्कार करून दाखविला.
Shivsena MP Sadashiv Lokhande

Shivsena MP Sadashiv Lokhande

Sarkarnama

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील काही भागांत सध्या विकासापेक्षा 'परका' हा राजकीय मुद्दा ठरविला जात आहे. मात्र चेंबूर व कुर्ला परिसरात लहानपण व राजकारणाची बाराखडी गिरविलेले सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande ) यांनी अहमदनगर जिल्ह्यातून निवडणूक लढविली आणि भाजपकडून ( BJP ) सलग तीन वेळा आमदार व शिवसेनेकडून ( Shivsena ) सलग दोन वेळा खासदार होण्याचा चमत्कार करून दाखविला. This is the political journey of Sadashiv Lokhande from Chembur to Shirdi

खासदार लोखंडे यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातीलच दिघोळचा. मात्र लहानपण चेंबूरच्या वत्सलाताई नाईकनगर झोपडपट्टीत गेले. उच्च माध्यमिकपर्यंतचे शिक्षण कुर्ल्यातील एका शाळेत झाले. त्यांची आई कुर्ला ते भायखळा दरम्यान भाजीपाला विकायच्या तर वडील गटई काम करायचे. त्यांच आठ भावंडांचं मोठ कुटूंब होतं.

<div class="paragraphs"><p>Shivsena MP Sadashiv Lokhande </p></div>
खासदार सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे यांना निवडणूक आयोगाची तंबी

लोखंडे ज्या भागात रहायचे तो भाग काँग्रेसचा गड होता. मात्र जनसंघाचे ज्येष्ठ नेते हशू अडवाणी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक डी.डी. देशपांडे हे या परिसरात प्रचार कार्य करायचे. हिंदूत्वाचं आकर्षण असलेले तरूण सदाशिव लोखंडे त्यांच्या संपर्कात आले. ते संघाच्या शाखांत जाऊ लागले. त्यांनी संघ कार्यात स्वतःला वाहून घेतले. 70च्या दशकात ते भारतीय जनता युवा मोर्चाचे सचिव झाले. प्रमोद महाजन यांच्या ते निष्ठावान कार्यकर्ते होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कर्जत व जामखेड या दोन तालुक्यांत कार्यकर्त्यांची मोठी बांधणी केली होती. एक वेळ काँग्रेसचा गड समजला जाणारा हा परिसर 1990 नंतर हळूहळू हिंदूत्व विचारांचा गड होऊ लागला. याच मतदार संघात संघाने 'माधव' पॅटर्न राबविल्याची चर्चा झाली. 1995 विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपची युतीत ही जागा भाजपच्या वाट्याला आली. या जागेवर कोणाला उभे करायचे यावर मतमतांतरे होती. मात्र प्रमोद महाजनांनी सदाशिव लोखंडे यांचे नाव पुढे करत ठाम विश्वास दर्शविला आणि लोखंडेंना विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले. या निवडणुकीत भाजपचे 65 जण आमदार झाले. यात सदाशिव लोखंडेही होते. त्यानंतर सलग तीन वेळा ते याच मतदार संघात आमदार म्हणून निवडून गेले.

<div class="paragraphs"><p>Shivsena MP Sadashiv Lokhande </p></div>
खासगी डॉक्‍टरांनी माणुसकी दाखवावी : खासदार सदाशिव लोखंडे

वाकचौरेंची चूक व लोखंडेंचा योगायोग

2009मध्ये लोकसभेच्या शिर्डी मतदार संघासाठी उमेदवाराचा शोध सुरू होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही जागा राष्ट्रवादीकडे ठेवली. या जागेवर पवारांनी रिब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांना उमेदवारी जाहीर केली. दक्षिण लोकसभा मतदार संघाची जागाही काँग्रेसला न देता पवारांनी राष्ट्रवादीकडेच राखली. त्यामुळे माजी मंत्री बाळासाहेब विखे पाटील नाराज झाले. शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी मिळाली. विखेंनी मतदानाच्या आधी दोन दिवस असे चक्र फिरविले की आठवलेंच्या स्मृती पटलावरून शिर्डीचा पराभव कधीच गेला नाही.

2014च्या निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसेनेचे तिकीट मिळणार हे निश्चित समजले जात होते. मात्र मतदानाला अवघे 20 दिवस बाकी असताना त्यांनी अचानक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेला उमेदवार हवा होता. तोही अनुसूचित जातीचा. देशात नरेंद्र मोदींची लाट आली होती. सदाशिव लोखंडे यांनी मतदानाच्या 15 दिवस आधी शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी अर्ज भरला. प्रचारही नीट न झालेले सदाशिव लोखंडे योगायोगाने शिर्डी मतदार संघाचे खासदार झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com