पंढरपूर : शिंदे गटाचा पंढरपुरात राज्यातील पहिला मेळावा घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde)यांचे समर्थक महेश साठे (Mahesh Sathe) यांना एका माथेफिरू फरार आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यामुळे पंढरपुरात खळबळ उडाली आहे. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
परमेश्वर देठे असं धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. घडलेली घटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातल्याची माहिती महेश साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
खुनातील फरार आरोपी परमेश्वर देठे यांनी फोन करून आपणास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप साठे यांनी केला. धमकी देणारा परमेश्वर देठे याच्यावर खूनाचा आरोप असून तो सध्या फरार आहे.
दोन आठवड्यापूर्वी तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. यामध्ये सतरा पैकी सात जागेवर परिचारक गटाने, साठे यांनी चार जागेवर तर भालके-काळे गटाने सहा जागांवर विजय मिळवला होता. महेश साठे यांनी आपल्याच कुटुंबातील पाच जणांना उमेदवारी देत चार जणांना विजयी केले. साठे यांनी स्वतंत्र आघाडी उभा केली असली तरी निवडणुकीपूर्वी त्यांनी भालके व काळे गटाशी हातमिळवणी केली होती.
यामुळेचे भालके – काळे गटाच्या उमेदवारांविरोधात त्यांनी आपले उमदेवार दिले नाहीत. निवडणुकीच्या निकालानंतर भालके – काळे व साठे यांची सत्ता येणार यावर शिक्कामोर्तब झाला होता. मात्र सरपंचपद खुले असल्याने यावरून वाद सुरू झाला. भालके–काळे गटाने साठे यांना विश्वासात न घेता परिचारक यांच्याबरोबर सरपंचपदासाठी बोलणी केली असल्याचा आरोप साठे यांनी यावेळी केला.
परमेश्वर देठे व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांवर मागील महिन्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी देठे फरार असताना देखील पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.