Solapur News : आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हा दूध संघाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. पंढरपूर येथील जिल्हा दूध संघाची (Dudh Sangh) जवळपास तीन एकर जागा आणि इमारत विक्री करण्याचा निर्णय घेतला असून तशी निविदा देखील प्रसिध्द करण्यात आली आहे. पंढरपूर-पुणे (Pune) रोड लगत असलेली कोट्यावधी रुपयांची मालमत्ता विक्रीस काढल्याने जिल्हा दूध संघाची आर्थिक स्थिती अजूनही कुमकूवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, पंढरपूर येथील मोक्याची आणि किंमती जागा जिल्हा दूध संघाने विक्री करु नये असा सूर काही माजी पदाधिकार्यांमधून आळवला जावू लागला आहे. जिल्हा दूध संघाचे संकलन घटल्याने संघ आर्थिक अडचणीत आला आहे. सध्या संघावर कर्जावर डोंगर आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी मुंबई येथील दूध संघाची जागा विक्री करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. मात्र, जागेला अपेक्षित किंमत येत नसल्याने तेथील जागेची विक्री रखडली आहे. त्यानंतर संघाने पंढरपूर (Pandharpur) येथील जागा विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंढरपूर शहरालगतच्या इसबावी येथे जिल्हा दूध संघाची जवळपास तीन एकर जागा आणि त्यामध्ये दूध प्रक्रियेसाठी उभारण्यात आलेली इमारत आहे. शिवाय रस्त्याच्या लगत व्यापारी गाळे अशी कोट्यावधी रुपयांची मालमत्ता आहे. ही मालमत्ता 28 कोटी रुपयांना विक्री करण्याचा निर्णय जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी घेतला आहे.
मागील काळात दूध संघ आर्थिक अडचणीत आला होता. त्यामुळे दूध संघाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी संचालक मंडळाने आता पंढरपूर येथील जागा आणि इमारत विक्रीस काढली आहे. आता ही मोक्याची जागा खरेदीसाठी कोण-कोण पुढे येणार याकडेच लक्ष लागले आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.