Solapur Politic's : करमाळ्यात दोन कुटुंबातील सहा जणांची नगरपरिषदेत एन्ट्री; पंढरपुरात मात्र मतदारांनी घराणेशाहीला नाकारले

Nagar Parishad Result 2025 : सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदा आणि अनगर नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. अनेक ठिकाणी नात्यागोत्याचे राजकारण झाल्याचे दिसून आले आहे.
Karmala Nagar Parishad Election result
Karmala Nagar Parishad Election resultSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 21 December : सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदा आणि अनगर नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. अनेक ठिकाणी नात्यागोत्याचे राजकारण झाल्याचे दिसून आले आहे. करमाळा नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर एकाच घरातील तिघे निवडून आहेत. तसेच, सावंत कुटुंबातील पती-पत्नी आणि भावजय हेही विजयी झाले आहेत. तर पंढरपुरात मात्र कुटुंबातील एकालाच मतदारांनी संधी देत दुसऱ्या व्यक्तीला नाकारले आहे. मंगळवेढ्यात चाळीस महिलांनी एकत्र येऊन मतदान केलेले तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार प्रमोद सावंजी हे प्रभाग दोनमधून विजयी झाली आहेत.

करमाळा नगरपरिषद निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप यांची सत्ता उलथवून टाकत मोहिनी सावंत ह्या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. सावंत कुटुंबातील तिघे एकाच वेळी नगरपरिषदेत विजयी झाले आहेत. मोहिनी सावंत यांचे पती आणि जाऊ असे तिघे करमाळा नगरपरिषदेत असणार आहेत.

करमाळ्यात नगराध्यक्ष मोहिनी संजय सावंत, त्यांचे पती संजय सावंत हे प्रभाग क्रमांक दोनमधून नगरसेवक म्हणून, तर नगराध्यक्षा सावंत यांच्या जाऊबाई चैत्राली सुनील सावंत ह्या प्रभाग क्रमांक दहामधून निवडून आल्या आहेत. नगरसेवकांमध्ये संजय सावंत हे करमाळ्यात सर्वाधिक मतांनी निवडून आले आहेत.

संजय सावंत यांच्या कुटुंबातील डी. के. सावंत हे १९६७ मध्ये करमाळ्याचे नगराध्यक्ष होते. त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती कायम नगरपालिकेत असते. तसेच, दोन ते तीन समर्थकही करमाळा नगरपालिकेत कायम असतात. करमाळ्यातील प्रभाग एक आणि दोनमध्ये सावंत कुटुंबीयांचे कायम प्राबल्य राहिलेले आहे.

Karmala Nagar Parishad Election result
Maharashtra local body elections: वर्षभरानंतरही महायुतीची ताकद कायम : नगराध्यक्षपदाच्या निकालात दिसला विधानसभेचा पॅटर्न

भाजपकडून सचिन घोलप हे प्रभाग क्रमांक नऊ ब मधून विजय झाले आहेत, तर त्यांची बहीण निर्मला गायकवाड ह्या प्रभाग तीनमधून, तर सचिन घोलप यांच्या भावजय लता विजय घोलप ह्या प्रभाग क्रमांक नऊ अ मधून विजयी झाल्या आहेत. त्यामुळे सावंत यांच्यासोबत करमाळ्यात एकाच कुटुंबातील तिघे विजयी झाले आहेत.

पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत मतदारांनी घराणेशाहीला धक्का देत कुटुंबातील एकालाच संधी दिली आहे. नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या उमेदवार श्यामल शिरसाट या पराभूत झाल्या असल्या तर त्यांच्या सूनबाई प्रतीक्षा विक्रम शिरसाट ह्या मात्र निवडून आल्या आहेत.

पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर हे पराभूत झाले आहेत. मात्र त्यांच्या पत्नी स्मिता फत्तेपूरकर ह्या निवडून आल्या आहेत. माजी नगराध्यक्ष राजश्री गंगेकर यांचा पराभव झाला असला तरी त्यांचा मुलगा अक्षय गंगेकर हा विजयी झाला आहे, त्यामुळे पंढरपूरच्या मतदारांनी कुटुंबातील एकालाच संधी दिली आहे.

Karmala Nagar Parishad Election result
Ambarnath Nagar Parishad Result : एकनाथ शिंदेंना पराभवाची धूळ, अंबरनाथ नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा; तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

मंगळवेढ्यात एकाच कुटुंबातील चाळीस महिला मतदानासाठी एकत्र आल्या होत्या. त्यांनी मतदान केलेले तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार प्रमोद सावंजी हे प्रभाग दोनमधून निवडून आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com