नगर शहरात आपत्ती व्यवस्थापनाचे तीन-तेरा

अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेला महिना पूर्ण होताच शहरातील एमआयडीसीत असलेल्या सनफार्मा कंपनीतील केमिकलला काल ( बुधवारी ) रात्री 10 वाजेच्या सुमारास आग लागली.
सनफार्मा कंपनी, अहमदनगर
सनफार्मा कंपनी, अहमदनगरदत्ता इंगळे

अहमदनगर : अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेला महिना पूर्ण झाला आहे. तरीही त्याचा अहवाल सार्वजनिक झालेला नाही. तसेच कोणावरही कारवाईही प्रशासनाकडून झाली नाही. अशा स्थितीत शहरातील एमआयडीसीत असलेल्या सनफार्मा कंपनीतील केमिकलला काल ( बुधवारी ) रात्री 10 वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. त्यामुळे आज सनफार्मा कंपनीला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. Three-thirteen disaster management in Ahmednagar city

सनफार्मा कंपनीतील लोडिंग-अनलोडिंग यार्डमध्ये काल रात्री 10 वाजेच्या सुमारास केमिकल सॉलवंटला आग लागली. आग लागल्याचे समजताच कंपनीच्या व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी तात्काळ एमआयडीसी अग्निशमन विभाग व महापालिका अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन विभागाचे 2 व महापालिका अग्निशमन विभागाचे 2 असे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. राहुरी नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाचाही बंब घटनास्थळी दाखल झाला आहे, अशी माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी दिली.

सनफार्मा कंपनी, अहमदनगर
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग : दहा रुग्णांचा मृत्यू

आग मोठी असल्याने आगीचे व धुराचे लोट लांब पर्यंत दिसून येत होते. आग विझविताना अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कंपनीतील अधिकारी रावसाहेब पागोडे यांचा मृतदेह आढळून आला आहे, अशी माहिती विश्वसनिय सूत्रांकडून समजते. सहा वर्षांपूर्वीही याच कंपनीतील केमिकलला आग लागली होती. त्यात चार जणांचा मृत्यू झाला होता. त्या आधीही गॅस गळतीने दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. मागील सात वर्षांत सनफार्मा कंपनीत तीन वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या घटनांची चौकशी झाली मात्र अहवाल कधीही समोर आला नाही.

घटनास्थळ नगर-मनमाड रस्त्या लगत आहे. तसेच घटनास्थळापासून 50 मीटरच्या आत पेट्रोल पंप आहे. जर एखाद्या केमिकल बॅरलचा स्फोट होऊन पेट्रोल पंपा लगत गेला असता तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती.

सनफार्मा कंपनी, अहमदनगर
नगर अग्निकांड : चौकशीचा केवळ फार्स नको; दोषींवर कारवाई व्हावी : राधाकृष्ण विखे

सनफार्मा कंपनीचे कानावर हात

काल रात्रीच्या घटनेनंतर आज सनफार्मा कंपनीने प्रसार माध्यमांशी बोलणे टाळत माध्यमांच्या प्रतिनिधींना पोलिस बळाचा वापर करून कंपनीच्या आवारात जाण्यास मज्जाव करण्यात आला. या घटनेवर कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती देणे टाळले आहे. कंपनीत आज दुपारी व्यवस्थापकांची बैठक झाली मात्र या बैठकी बाबतही कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

धोकादायक केमिकल कंपनी

सनफार्मा कंपनीच्या पूर्वेला नगर-मनमाड महामार्ग, तर दक्षिण बाजूला एमआयडीसीत जाणारा प्रमुख रस्ता वाहत असतो. या शिवाय या कंपनीच्या जवळ दोन पेट्रोल पंपही आहेत. कंपनीतील केमिकलला आग लागल्याने नागापूर परिसरात केमिकलचा वास सुटला होता. या परिसरातील नागरिकांनी भीतीने रात्र जागून काढली. आज सायंकालपर्यंत कंपनीच्या जवळील महामार्गावर केमिकलचा वास येत होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com