Satara : बड्या हस्तीसाठी ठोसेघरला भेकराची शिकार; तिघेजण ताब्यात

उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांना ठोसेघर thoseghar येथे सोमवारी भेकराची शिकार केल्‍याची माहिती मिळाली. यानुसार मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे वनविभागाने forest officers तपास सुरू केला.
Forest Department action
Forest Department actionsarkarnama
Published on
Updated on

सातारा : ठोसेघर (ता. सातारा) येथे बंदुकीने गोळ्या झाडत भेकराची शिकार केल्‍याप्रकरणी सातारा वनविभागाने तिघांना ताब्‍यात घेतले आहे. ताब्‍यात घेतलेल्‍यांकडून शिकारीसाठी वापरलेल्‍या बंदुका, तसेच भेकराचे मांस जप्‍त केले आहे. ताब्यात घेतलेल्यापैकी युवराज निमन हा आसाम रायफलमध्‍ये सध्‍या कार्यरत आहे. दरम्यान, चौकशीत हे मांस साताऱ्यातील एका बड्या हस्‍तीला देण्‍यात येणार होते. शिकार झाल्‍याचे कळल्‍यानंतर हे मांस ती बडी हस्‍ती रात्री नेणार असल्‍याचे चौकशीत समोर आले असून, ती बडी हस्‍ती कोण, याचा शोध सध्‍या सुरू आहे.

उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांना ठोसेघर येथे सोमवारी भेकराची शिकार केल्‍याची माहिती मिळाली. यानुसार सहायक वनसंरक्षक सुधीर सोनवले, वनक्षेत्रपाल डॉ. निवृती चव्‍हाण, वनपाल सचिन डोंबाळे, मानद वन्‍यजीव रक्षक रोहन भाटे व इतरांनी मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे तपास सुरू केला.

तपासादरम्‍यान माची पेठेतील श्री वास्‍तू अपार्टमेंटमधील युवराज निमन याच्‍या घरावर छापा टाकण्‍यात आला. तेथून वनविभागाने भेकर, चौसिंगा या वन्‍यप्राण्‍यांचे मुंडके, ताजे मांस, पायाचे खुर जप्‍त केले. चौकशीत निमनने शिकार ठोसेघर येथील नारायण सीताराम बेडेकर, विठ्ठल किसन बेडेकर यांच्‍या मदतीने आज सकाळी साडेसातच्‍या सुमारास केल्‍याचे सांगितले.

यानुसार विठ्ठल बेडेकर, नारायण बेडेकर यांच्‍या घरावर छापा टाकत त्‍यांच्‍या घरातून लपविलेले मांस जप्‍त करण्‍यात आले. त्‍या तिघांनी शिकार केल्‍यानंतर भेकर, चौसिंग्‍याचे सोललेले कातडे ओढ्यात लपवून ठेवत मांसाचे वाटे केल्‍याचे सांगितले. वनविभागाने लपविलेले मांस, दोन बंदुक, जिवंत काडतुसे, चाकू, कोयता, कातडे जप्‍त केले आहे.

Forest Department action
'वाघ म्हातारा झाला तरी शिकार करायची सोडत नाही'

शिकारप्रकरणी तिघांना अटक करण्‍यात आली असून, त्‍यांच्‍यावर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. अटकेतील संशयित सराईत शिकारी असून, त्‍यांनी यापूर्वी वेगवेगळे वन्‍य गुन्‍हे केले आहेत. कारवाईत वनपाल दीपक गायकवाड, खुशाल पावरा, वनरक्षक विक्रम निकम, राज मोसलगी, अशोक मलप, मारुती माने, साधना राठोड, अश्‍विनी नरळे, राजेश वीरकर, सुहास पवार, सुरेश गबाले, दिनेश नेहेरकर, पवन शिरतोडे हे सहभागी झाले होते.

Forest Department action
मध्यावधी निवडणुकांचं लॉजिक काय? एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना सवाल

वनविभागाने ठोसेघर येथील नारायण बेडेकर याच्‍या घरावर छापा टाकत एका खोलीत पिशवीत लपवून ठेवलेले भेकर, चौसिंग्‍याचे ताजे मांस जप्‍त केले. चौकशीत हे मांस साताऱ्यातील एका बड्या हस्‍तीला देण्‍यात येणार होते. शिकार झाल्‍याचे कळल्‍यानंतर हे मांस ती बडी हस्‍ती रात्री नेणार असल्‍याचे चौकशीत समोर आले असून, ती बडी हस्‍ती कोण, याचा शोध सध्‍या सुरू आहे.

Forest Department action
Udayanraje Bhosale : इंग्लंडमधील भवानी तलवारीबाबत उदयनराजे भोसले म्हणाले..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com