Mahabaleshwar : पर्यटकांना लाखोंचा गंडा; हॉटेल्सच्या नावे बनावट पेज करून फसवणूक

गेल्या दोन-तीन दिवसांपासून बनावट पेज fake page तयार करून तीन ते चार लाख रुपयांहून अधिकची फसवणूक Fraud झाल्याबाबतची तक्रारी अर्ज महाबळेश्वर पोलिस ठाण्यात Mahabaleshwar Police Station देण्यात आली आहे.
MTDC Mahabaleshwar
MTDC Mahabaleshwarsarkarnama
Published on
Updated on

महाबळेश्वर : महाबळेश्वरात पर्यटनासाठी ऑनलाइन बुकिंग करणे पर्यटकांना महागात पडले आहे. एका हॉटेल्सच्या नावाने बनावट पेज तयार करून आरक्षणाच्या नावाखाली पर्यटकांना लाखो रूपयांचा गंडा घातला गेला आहे. एमटीडीसीसह ब्राइटलँड हॉटेलने या संदर्भात पोलिसांत धाव घेत तक्रार अर्ज दाखल केला आहे. दोन दिवसांत तीन ते चार लाख रुपयांहून अधिकचा गंडा पर्यटकांना घालण्यात आला आहे.

महाबळेश्वरातील हॉटेल्सची साईट हॅक करून अथवा नव्याने हॉटेलचे पेज तयार करून ही फसवणूक करण्यात येत होती. या साईटवर गुगल पे व बँक अकाऊंट देण्यात येतो, आरक्षणाच्या नावाखाली पैसे घेऊन लाखोंची फसवणूक करण्यात येत आहे. ऑनलाइन हॉटेल शोधताना येथील काही हॉटेल्सचे बनावट पेज तयार करून त्यावर खाते क्रमांक, गुगल पे नंबर देण्यात आला आहे.

संबंधित भामटा हा आपला नंबर अथवा खात्यावर ऑनलाइन पैसे मागून हॉटेलच्या नावाने आरक्षित झालेल्या रूमची खोटी रिसीट तयार करून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पर्यटकांना पाठवत होता. पर्यटक ऑनलाइन बुकिंगनंतर हॉटेलवर पोचल्यावर त्याच्या नावाने कोणतेच बुकिंग करण्यात आले नसल्याचे निदर्शनास आली. यातून आपली फसवणूक झाल्याचे पर्यटकांच्या लक्षात आले.

MTDC Mahabaleshwar
'मायक्रो फायनान्स' मधून लाखोंची फसवणूक करणाऱ्या 'बंटी-बबली' च्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

एमटीडीसीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या तक्रारी अर्जात अमित संघवी, अहमदाबाद (गुजरात) या पर्यटकास ५९ हजार रुपये, श्रेयस नाईक या पर्यटकास १७ हजार ५७३ रुपये, रविशंकर, चिंचवड (पुणे) यांना ९७ हजार रुपये यांच्यासह अनेक पर्यटकांना लाखोंचा गंडा घालण्यात आला असल्याच्‍या तक्रारी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आल्‍या आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून बनावट पेज तयार करून तीन ते चार लाख रुपयांहून अधिकची फसवणूक झाल्याबाबतचे तक्रारी अर्ज पोलिस ठाण्यात देण्यात आले आहेत.

MTDC Mahabaleshwar
Panchgani : मुख्याधिकाऱ्यांवर शाई फेकली; महाबळेश्वर, पाचगणीत कर्मचाऱ्यांचे कामबंद

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com