Ashokrao Mane : हातकणंगलेच्या नव्या आमदारांनी भरला अधिकाऱ्यांना दम; वाहतूक कोंडीमुळे संतप्त

Ashokrao Mane Traffic Jam Warned the authorities :, नागरिकांची वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या गैरसोयीमुळे आमदार माने चांगलेच संतप्त झालेले दिसले. लोकांची गैरसोय होता कामा नये, अशा सूचना त्यांनी दिल्या.
Ashokrao Mane
Ashokrao Manesarkarnama
Published on
Updated on

Ashokrao Mane News : सांगली -कोल्हापूर मार्गावर हातकणंगले बस स्थानक चौकात गेली अनेक महिन्यांपासून कोंडी नित्याचीच बनली आहे. त्यात ऊस हंगाम सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि ट्रॅक्टरमुळे नागरिकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. याची माहिती नूतन आमदार अशोकराव माने यांना लागताच त्यांनी थेट हातकणंगलेतील बस स्थानक चौकातील परिसर गाठत पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना तेथे बोलावून कान उघाडणी केली.

नागरिकांची वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या गैरसोयीमुळे आमदार माने चांगलेच संतप्त झालेले दिसले. मुख्य हायवेवरील बसस्थानक चौकात होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीचे तात्काळ नियोजन करा, लोकांची गैरसोय होता कामा नये, अशा सूचना त्यांनी दिल्या.

Ashokrao Mane
Amol Kolhe News : प्राजक्ता माळी अन् धस यांच्या वादात अमोल कोल्हेंच मोठे विधान; म्हणाले,...

सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी आमदार अशोकराव माने यांनी आज (शनिवारी) सकाळी स्वतः जागेवर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. प्रशासनाला तात्काळ यातून मार्ग काढत वाहतूक नियंत्रकासह मुख्य हायवे समोरील पंचायत समिती ऑफीस ते इचलकरंजी फाटा येथे नेहमी होणारा वाहतूक अडथळा दूर करण्याच्या सूचना दिल्या. पुन्हा या मार्गावर वाहतूक कोंडी दिसल्यास एकाही अधिकाऱ्याला सोडणार नाही, असा दम आमदार अशोकराव माने यांनी दिला.

मतदारसंघातील नागरिकांची गैरसोय झाल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही.हे सांगतानाच चुकीच्या नियोजनाने अपघातासारखे प्रसंग घडल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल अशी सक्त ताकीदही दिली.

यावेळी प्रशासनासोबत चर्चा करून अतिक्रमण,पार्किंग शिस्त,हायमास्ट, डिव्हायडर तसेच संध्याकाळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक हवालदार उभा करणे व नागरिकांची हेळसांड थांबवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

Ashokrao Mane
Amol Kolhe News : प्राजक्ता माळी अन् धस यांच्या वादात अमोल कोल्हेंच मोठे विधान; म्हणाले,...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com