अधिकाऱ्यांनी दुधातील पाणी बंद केले; नेतेमंडळी लोणी शेतकऱ्यांपर्यंत पोचू देतील का?

प्रशासकीय मंडळाच्या काळात लागलेली सवय संचालक मंडळाच्या कालावधीत कायम राहणार की पुन्हा ते दिवस येणार? याची धाकधूक सभासदांना लागली आहे.
Solapur District Dudh Sangh Administrator
Solapur District Dudh Sangh Administratorsarkarnama

सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघावर (dudh pandhari) गेल्या वर्षी ८ मार्च रोजी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय मंडळाची नियुक्ती झाली होती. उद्या बरोबर एक वर्षानंतर जिल्हा दूध संघ प्रशासकीय मंडळाकडून संचालक मंडळाच्या हातात जाणार आहे. प्रशासकीय मंडळाच्या काळात दुधातील पाणी बंद झाले, कर्मचाऱ्यांना शिस्त आणि काटकसरीची सवय लागली आहे. प्रशासकीय मंडळाच्या काळात लागलेली सवय संचालक मंडळाच्या कालावधीत कायम राहणार की पुन्हा ते दिवस येणार? याची धाकधूक सभासदांना लागली आहे. (Transferred from Solapur District Dudh sangh Administrator to newly elected Director)

प्रशासकीय मंडळ म्हणून दूध संघावर सुरुवातीला तत्कालिन विभागीय दुग्ध उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांची नियुक्ती झाली. त्यानंतर एक महिन्यांनी जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीनिवास पांढरे, सहाय्यक निबंधक आबासाहेब गावडे, सहकार अधिकारी सुनील शिंदे या तीन अधिकाऱ्यांचे प्रशासकीय मंडळ दूध संघावर आले. प्रशासकीय मंडळ दूध संघावर येण्यापूर्वी उणे के.जी. फॅट व के. जी. एसएनएफ प्रशासकीय मंडळाच्या काळात प्लसमधये आला, तो आजतागायत टिकून आहे. दुधाची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी येणाऱ्या खर्चातही बचत झाली आहे. गुणवत्तेच्या दुधाचा पुरवठा संघात होऊ लागला. दूध संघाची थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासकीय मंडळाने भरीव प्रयत्न केले आहेत. वाशी येथील जागेचे प्रामाणिकपणे मुल्यांकन केल्याने कवडीमोल दराने जाणाऱ्या जागेला सोन्याचा भाव आला आहे.

Solapur District Dudh Sangh Administrator
कात्रज डेअरी निवडणूक : म्हस्के, जगताप, पासलकर बिनविरोध; उद्या चित्र स्पष्ट होणार

प्रशासकीय मंडळ कठोर होताच चार लाखांचा भरणा

दूध संघाच्या गैरव्यवहार प्रकरणातील कर्मचारी संजयकुमार येलगुंडे यांनी दूध संघाला दिलेला धनादेश बाऊन्स झाला. ही रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासकीय मंडळाने कठोर भूमिका घेतल्यानंतर आज तब्बल चार लाख रुपयांचा रोख भरणा दूध संघात झाला आहे. प्रशासकीय मंडळाचा असलेला वचक आज पुन्हा एकदा दूध संघाने अनुभवला आहे.

Solapur District Dudh Sangh Administrator
'वाळू माफियांवर कारवाई करू...पण आमदारांनी सोडण्यासाठी फोन करू नये'

शेटफळच्या जागेवरील अतिक्रमण निघेना

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या संस्थांसाठी केंद्र सरकारची योजना आहे, त्यातून दूध संघाला ३५ कोटी रुपयांचे अनुदान मिळवायचे होते. वाशी येथील जागेची विक्री करून दूध संघ कर्जमुक्त करून मशिनिरी अद्ययावत करायच्या होत्या. शेटफळ (ता. मोहोळ) येथील दूध संघाच्या पाच एकर जागेवर अतिक्रमण झाले आहे. ही जागा ताब्यात घेण्यासाठी दोन वेळा आम्ही प्रयत्न केला, परंतु राजकीय बळामुळे हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. दूध संघाला सोलापूर जिल्ह्यात खूप मोठी संधी आहे. ती संधी साधता आली पाहिजे, असे दूध संघाच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास पांढरे यांनी सांगितले.

Solapur District Dudh Sangh Administrator
राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदमांची शिवीगाळ प्रकरणातून दोषमुक्तता

भूमिपूत्र अधिकाऱ्यांची धडपड

सोलापूर जिल्हा दूध संघ वाचविण्यासाठी सहकार विभागात काम करणारे जिल्ह्यातील तीन भूमिपुत्र अधिकारी धावून आले होते. जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीनिवास पांढरे हे सोलापूर शहरातील आहेत. सहाय्यक निबंधक आबासाहेब गावडे हे साडे (ता. करमाळा) येथील आहेत. सहकार अधिकारी सुनील शिंदे हे सोलापूर शहरातील आहेत. आपल्या जिल्ह्याचा दूध संघ अडचणीतून बाहेर काढण्यासाठी या तीन भूमिपुत्र अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com