Ahmednagar News : पोलिस ठाण्यातच फुटले स्टॉलधारकांचे फटाके; श्रीरामपूरमध्ये नेमकं काय झालं ?

Shrirampur Police Station : पोलिस ठाण्यातच वाद घालणाऱ्या दोन गटांवर तीन गुन्हे दाखल
Shrirampur Police Station
Shrirampur Police StationSarkarnama

Ahmednagar Political News : दिवाळीचे फटाके कोठे आणि कसे फुटतील, याचा नेम नाही. श्रीरामपूरमध्येदेखील स्टॉलधारकांमधील वादाचा फटाके थेट पोलिस ठाण्यात फुटले. हे दोन्ही गटांतील वाद एवढ्या विकोपाला गेले होते की, त्यांच्यात पोलिस ठाण्यातच हाणामारी झाली. या हाणामारीप्रकरणी दोन्ही गटांच्या तक्रारीवरून परस्परविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच पोलिस ठाण्यात येऊन गोंधळ घातल्याप्रकरणी स्वतंत्र तिसऱ्या गुन्ह्याची नोंद घेतली आहे. (Latest Political News)

श्रीरामपूर शहरातील राम मंदिराजवळ फटाके स्टॉल लावले होते. तिथे फटाके विक्रीसाठी नीलोफर आबेद कुरेशी (वय २४, रा. फातेमा हौसिंग सोसायटी, वार्ड नंबर दोन) आणि अमीर सय्यद यांचा शेजारी शेजारी स्टॉल होता. साठलेले पाणी स्टॉलवर उडाल्याने या दोघा स्टॉलधारकांमध्ये वाद झाला. यातून दोन्हीकडील स्टॉलधारकांचा जमाव जमला. यात दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली.

Shrirampur Police Station
Nagar Politics : ‘मी आनंद निर्माण करण्यासाठी आलोय’; कोल्हेंच्या वक्तव्याचा अर्थ शोधण्यात गुंतले नगरमधील मातब्बर...

हे दोन्ही गट पोलिस ठाण्यात गेल्यावर तिथेही वाद विकोपाला पोहाेचला. यात एकाने तेथील खुर्ची उचलून समोरच्याच्या डोक्यात घातली. या प्रकारामुळे श्रीरामपूर पोलिस ठाण्यातच गोंधळ उडाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर दोन्ही गटाला वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले.

पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी हवालदार गौतम लगड यांच्या फिर्यादीवरून रुकसाना बिस्मिल्ला, राजू सय्यद, बिस्मिल्ला राहेमानतुल्ला सय्यद, नीलोफर आबेद कुरेशी, आबेद अकबर कुरेशी, तोफिक अकबर कुरेशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर दोन्ही गटांच्या परस्परविरोधी फिर्यादीवरून आणखी दोन गुन्ह्याची नोंद झाली. (Maharashtra Political News)

नीलाेफोर आबेद कुरेश यांच्या फिर्यादीवरून अमीर राजू सय्यद, समीर महंमद सय्यद, अमन महंमद सय्यद, नवाज महंमद सय्यद, राजू रहेमतुल्ला सय्यद, अमीर सय्यद यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. रुकसाना बिस्मिल्ला यांच्या फिर्यादीवरून नीलोफर आबेद कुरेशी, तौफिक अकबर कुरेशी, आबेद अकबर कुरेशी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Shrirampur Police Station
Swabhimani Shetkari Sanghatana : 'स्वाभिमानी'चं आंदोलन पेटलं; कोल्हापुरात ठिकठिकाणी जाळपोळ, कार्यकर्ते आक्रमक!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com