Nagar Politics : ‘मी आनंद निर्माण करण्यासाठी आलोय’; कोल्हेंच्या वक्तव्याचा अर्थ शोधण्यात गुंतले नगरमधील मातब्बर...

Vikhe Patil Vs Thorat : कोपरगावमधील संजीवनी आणि संगमनेरच्या मदतीने गणेशमधील यावर्षीचा गळीत हंगामदेखील चांगला होईल.
Radhakrishna Vikhe Patil-Vivek Kolhe-Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe Patil-Vivek Kolhe-Balasaheb ThoratSarkarnama

Nagar News : नगर उत्तरेतील दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील-बाळासाहेब थोरात यांच्या साखर पेरणीतून राजकीय चाचपणीमुळे सर्वांची दिवाळी गोड झाली. यातून या दोघा नेत्यांकडून राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळच मिळाले. राहाता तालुक्यातील श्री गणेश सहकार साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांना बाळासाहेब थोरातांकडून मिळालेले बळ आगामी काळातील राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहे. ‘गणेश’मधील लक्ष्मीपूजनावेळी कोल्हे यांनी ‘आनंद निर्माण करण्यासाठी आलोय’, हे विधान केले. आता हे विधान चर्चेत आले असून, राहाता, कोपरगाव, संगमनेर तालुक्यांसह भाजप आणि काॅंग्रेसमधील राजकीय धुरिण या विधानाचा अन्वयार्थ शोधण्यात गुंतले आहेत. ('I have come to create happiness': Vivek Kolhe)

राहाता तालुक्यातील श्री गणेश सहकारी साखर कारखान्यात भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते रविवारी लक्ष्मीपूजन करण्यात आले. या वेळी विवेक कोल्हे यांनी शेतकरी, सभासद, कारखान्यातील कामगार आणि ऊसतोड कामगारांशी संवाद साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Radhakrishna Vikhe Patil-Vivek Kolhe-Balasaheb Thorat
Wankhede Meet Raut : समीर वानखेडे-संजय राऊतांची भेट विदर्भात शिवसेनेला नवा चेहरा मिळवून देणार...

‘श्री गणेशाच्या आशीर्वादाने आणि सभासदांच्या पाठिंब्याने कारखाना सुरू झाला आहे. कोपरगावमधील संजीवनी आणि संगमनेरच्या मदतीने गणेशमधील या वर्षीचा गळीत हंगामदेखील चांगला होईल. दहा वर्षांत कारखाना कधीच चांगला चालला नव्हता. तो या वर्षी एवढ्या सुरळीत आणि जोमात सुरू आहे. कारखाना परिसरात बैलगाड्या दिसत आहेत, ऊस दिसत आहे. कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. हाच आनंद निर्माण करण्यासाठी मी आलोय,' असे विधान या वेळी विवेक कोल्हे यांनी केले.

विवेक कोल्हे यांनी श्री गणेश कारखान्याकडून दहा किलो साखर मोफत वाटण्याचा उपक्रम बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे सांगितले. गेली काही वर्षे कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक मिळत होती. सभासदांची बंद झालेली साखर पुन्हा सुरू केली आहे. नऊ टक्के बोनस देण्याबरोबरच रेग्युलर दोन पगारही दिले आहेत. आम्ही येथे आलोय, ते आनंद देण्यासाठी. आगामी काळात प्रत्येक लक्ष्मीपूजनाला आपली भेट होत राहील, असे सांगितले.

Radhakrishna Vikhe Patil-Vivek Kolhe-Balasaheb Thorat
ED Summons To Pednekar : किशोरी पेडणेकरांना ईडीने पुन्हा पाठविले समन्स; २३ नोव्हेंबरला चौकशीला बोलावले

श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुधील लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, गंगाधर चौधरी, धनंजय जाधव, शिवाजी लहारे, संजय शेळके, वसंत लभडे, भाऊसाहेब चौधरी, जयराज दंडवते, भाऊसाहेब थेटे, विक्रम वाघ, सर्जेराव जाधव, बलराज धनवटे उपस्थित होते.

Radhakrishna Vikhe Patil-Vivek Kolhe-Balasaheb Thorat
Sharad Pawar Certificate : पवारांच्या मदतीला संभाजी ब्रिगेड; सोशल मीडियातून फिरणाऱ्या ओबीसी दाखल्याचा केला पर्दाफाश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com