Satara Political News : उदयनराजेंच्या 'आस्ते कदम'च्या बॅनरनं परळी खोऱ्यातलं राजकारण तापलं...

UdayanRaje Vs ShivendraRaje Bhosale : परळी भागात उदयनराजे पुन्हा सक्रिय जरी झाले तरी...
UdayanRaje Vs ShivendraRaje Bhosale
UdayanRaje Vs ShivendraRaje Bhosale Sarkarnama
Published on
Updated on

Satara News : सातारा तालुक्यातील परळी खोरं म्हणजे दोन्ही राजेंचा एकेकाळचा बालेकिल्ला परंतु, उरमोडी धरणाच्या वीज प्रकल्पात झालेल्या त्या राड्यानंतर उदयनराजे परळी भागात फिरकलेच नाहीत अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे उदयनराजे यांची परळी भागावरील पकड कमी झाल्यामुळे दहा वर्षांत परळीची एकहाती सत्ता काबीज करण्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले यशस्वी झाले.

उदयनराजे(UdayanRaje Chhatrapati) आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्यातील वाकयुध्द नेहमीच सुरू असतं आणि आरोप प्रत्यारोप सुरूच असतात. मात्र, अचानक दुर्लक्षित परळी खोऱ्यात आस्ते कदम,आस्ते कदम महाराज येत आहेत. परळी जिल्हा परिषद गटात असे बॅनर लागल्याने परळीतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले .

UdayanRaje Vs ShivendraRaje Bhosale
Devendra Fadnavis Statement: शरद पवारांच्या समर्थनार्थ फडणवीस मैदानात;राहुल गांधीवर केला 'हा' गंभीर आरोप,म्हणाले...

परळी भागात उदयनराजे पुन्हा सक्रिय जरी झाले तरी त्यांना परळी खोऱ्यात कार्यकर्ते जमवाजमव करण्यासाठी आपार कष्ट घ्यावे लागणार असून ,शिवेंद्रसिंहराजे यांच्या गेल्या दहा वर्षांपासून ताब्यात असलेल्या परळी खोऱ्याला ताब्यात घेणं सुध्दा सोपं नाही. यामुळे आगामी काळात कोण परळी काबीज करणार याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागून राहिले...

पेटिंग काढण्यापेक्षा लोकांची कामे करावीत...

साताऱ्याचं राजकारण सातत्यानं राजेंभोवती फिरत आलं आहे. काही दिवसांपूर्वीच दोन्ही राजेंमध्ये वादाची ठिणगी पडली होती. उदयनराजे भोसले यांचं पेटिंग साकारण्याला आक्षेप घेतला गेला आणि साताऱ्यातील राजकारण पुन्हा तापलं. आता याच प्रकरणावरून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांनी डिवचलं होतं.

UdayanRaje Vs ShivendraRaje Bhosale
Satara News: विरोधकांना राजकारणासाठी बाजार समितीची सत्ता हवीये; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, लोकांची कामे केली म्हणूनच मी आमदारकीला निवडून आलो. परंतु लोकांचे प्रेम असून, देखील खासदारकीला उदयनराजे भोसले पडले. त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन करावे आणि पेटिंग काढण्यापेक्षा लोकांची कामे करावीत असा टोला भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com