Satara News : उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंवर निशाणा; म्हणाले, कामे करता येत नसतील तर, विरोध तरी करु नका...

Udayanraje Bhosale उदयनराजे म्‍हणाले, साताऱ्यातील युवकांच्‍या रोजगारासाठी इनोव्हेटीव्ह साताराच्या माध्यमातुन प्रयत्न सुरु आहेत.
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

Udayanraje Bhosale News : सातारा पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा वातावरण तापविण्यास सुरवात केली आहे. यामाध्यमातून आमदार शिवेंद्रराजेंवर निशाणा साधण्याचे काम ते करत आहेत. आज सातारा व जावळी तालुक्यातील सुसंवाद बैठकीत त्यांनी कामे करता येत नसतील तर विरोध तरी करु नका, असा सल्ला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना दिला.

वर्ये (ता.सातारा) येथील सातारा विकास आघाडीच्या Satara Vikas Aghadi माध्यमातून आयोजित सातारा-जावलीतील नागरीकांसाठीच्या सुसंवाद बैठकीत खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale बोलत होते. यावेळी त्‍यांनी घराण्याचा वारसा, वसा जपताना, शेवटच्या श्वासापर्यंत समाजाची सेवा करीत राहणार, असल्‍याचे वचन उपस्‍थितांना दिले.

या सुसंवाद बैठकीसाठी माजी आमदार सदाशिव सपकाळ, यशवंतराव ढाणे, जिल्‍हा परिषदेचे माजी उपाध्‍यक्ष रवि साळुंखे, माजी सभापती सुनील काटकर, अर्चना देशमुख, संदिप शिंदे, समृध्दी जाधव, विजय काळे यांच्‍यासह सातारा, जावलीतील मान्‍यवर आणि ग्रामस्‍थ उपस्‍थित

यावेळी बैठकीस उपस्‍थित असलेल्या नागरीकांची मते जाणून घेतल्‍यानंतर उदयनराजे म्‍हणाले, साताऱ्यातील युवकांच्‍या रोजगारासाठी इनोव्हेटीव्ह साताराच्या माध्यमातुन प्रयत्न सुरु आहेत. आयटी पार्कसाठी पशुसंवर्धन विभागाची जागा उदयोग मंत्रालयाकडे हस्तांतरणाचा प्रस्ताव आम्‍ही शासनास दिला आहे.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Satara NCP News : कालपर्यंत अजित दादांसोबत असलेले मकरंद पाटील आज पवारसाहेबांच्या गाडीत...

जिल्हयात जागतिक पर्यटन स्थळे असून त्‍याठिकाणच्‍या पर्यटनास चालना देण्‍यासाठीचा आराखडा आम्‍ही तयार केला असुन जावलीसह धरणग्रस्तांचे प्रश्‍‍न निकाली काढण्‍यासाठी शासनाशी संपर्क सुरु आहे. आजपर्यत अनेकांनी पदरमोड करत आम्‍हाला साथ दिली. कार्यकर्त्यांची जेवढी निष्ठा आमच्यावर आहे तेवढीच माझी त्‍यांच्‍यावर आहे.

कार्यकर्ते म्हणजे कुटुंब समजुन आम्ही आजपर्यंत वागलो, असून त्‍यात कोणतीही कमतरता यापुढील काळात राहणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले. याचवेळी त्‍यांनी कामे तुम्‍हीच केली, असे मी सगळ्यांना सांगतो. कामे करता येत नसतील तर विरोध तरी करु नका,अशा शब्‍दात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्‍यावर नाव न घेता उदयनराजेंनी टीका केली.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Vs Shivendraraje : दोन राजांच्या वादात आता राऊतांची एन्ट्री ; म्हणाले, "हा तर छत्रपतींच्या .."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com